इचलकरंजीचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
इचलकरंजीचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत

इचलकरंजीचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत

sakal_logo
By

इचलकरंजीचा पाणीपुरवठा होणार विस्कळीत
पंचगंगेची पाणी पातळी खालावल्याने उपसा बंद; इंटेकवेल पडले उघडे
इचलकरंजी, ता. १२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीतील पाणी उपसा आज बंद पडला. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे इंटेकवेल उघडे पडले आहे. या योजनेतून सुमारे ९ एमएलडी पाणी मिळत होते. त्याची तूट जाणवणार आहे. त्यामुळे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात अडचणी येणार आहेत. परिणामी, अंशतः पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. कृष्णातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होते. पंचगंगा नदीतून ९ एमएलडी पाणी मिळते. पण पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. इचलकरंजी बंधारा उघडा पडला आहे. त्यामुळे पंचगंगा योजनेचे दोन्ही उपसा पंप आज बंद पडले. पण सुदैवाने कट्टी मोळा डोह मोठा आधार ठरणार आहे. या नव्या योजनेतून १२ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. काही भागात एक ऐवजी दोन दिवस आड पाणी येण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाकडून पंचगंगा नदीमध्ये धरणातून पाणी पुरवठा करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनीही पाटबंधारे विभागाबरोबर संपर्क केला आहे. त्यामुळे एक - दोन दिवसांत धरणांतून पाणी सोडल्यानंतर पंचगंगा नदीतील पाणी उपसा पूर्ववत होईल, असे जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी सांगीतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57603 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top