
कंभी १
सत्ताधाऱ्यांचा कारभार नियोजनशून्य
राजर्षी शाहू आघाडीचा आरोप; विविध मागण्यांसाठी मोर्चा
कुडित्रे, ता.१२ ः कुंभीवर साखर तारण सोडून पावणे तीनशे कोटी कर्ज झाले, मागील शंभर व गतहंगामातील शेवटचे बिल त्वरित मिळावे, अशी मागणी करून सत्ताधाऱ्यांचा कारभार नियोजनशून्य असल्याचा आरोप राजर्षी शाहू आघाडीने केला. विविध मागण्यांसाठी आघाडीने आज कुंभी कारखान्यावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांनी केले. मोर्चाआधी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते.
खाडे म्हणाले की, २०१७/१८ चे चार कोटी ऊस बिल देणे आहे. गतहंगामातील सुमारे ६५ हजार टनांचे ३२ हजार कोटी रुपये बिल देणी आहेत. तोडणी वाहतूक बिल कमिशन २० कोटी, कामगारांचे ११ महिन्यांचे पगार थकले आहेत. कामगार फंड, फरक, कामगार सोसायटी ५१ कोटी ५६ लाख देणी थकली आहेत.
यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी निवृत्त कामगारांचे चार कोटी देणी असून देणी त्वरित द्यावीत, कामगारांचा थकीत पगार लवकर द्यावा,
डिस्टिलरीचे चुकीच्या पद्धतीने होणारे विस्तारीकरण रद्द करावे. सवलतीच्या दरात साखर वाटप करावे, अशा मागण्या केल्या. एस. के. पाटील, आनंदा पाटील, भरत खाडे, राजू सूर्यवंशी, हिंदुराव तोडकर, आनंदराव पाटील, सर्जेराव पाटील, टी. एल. पाटील, शामराव गोधडे, सज्जन पाटील, बुद्धीराज पाटील, नामदेव पाटील, शाहू काटकर, सुभाष पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57605 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..