हलकर्णीत महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णीत महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती उत्साहात
हलकर्णीत महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती उत्साहात

हलकर्णीत महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती उत्साहात

sakal_logo
By

21389
हलकर्णी : महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती सोहळ्यानिमित्त मिरवणुकीत सहभागी महिला.

महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती
हलकर्णीमध्ये उत्साहात
नूल, ता. १२ : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी मंदिराची वास्तुशांती व कळसारोहण सोहळा उत्साहात झाला. मुक्ती मठाचे प. पू. सिद्धसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना धार्मिक विधी झाले. सायंकाळी गावातून महालक्ष्मीचा जय घोष करत, गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करत, हजारो महिला सुहासिनीनि डोक्यावर कळस घेऊन रथातून देवीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी मंदिरात नवग्रह शांती, होम हवन, प्रदक्षिणा मृत्युंजय स्वामी, गुरुलिंग हिरेमठ, मंदिर हकदार, यांच्या हस्ते आदी धार्मिक विधी पार पडले. ३० किलो आणि १३ किलो वजनाचे पितळी कळस, घंटा, कासव खंणदाळ येथील लक्ष्मण यरकदावर या कारागी राने तयार केला आहे. श्री सोमेश्वर स्वामीजींच्या हस्ते पूजन करून कळस शिखरावर चढविण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. त्यानंतर गावातून धनगरी ढोलच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करीत महिलांनी दुरडीची मिरवणूक काढली. महालक्ष्मीच्या वास्तुशांती सोहळ्यास गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी, माजी जि. प. सदस्य जयकुमार मुनोळी, तंटामुक्त उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी, अशोक पुजेरी, के. के. पाटील, अशोक पाटील, बाबुराव पाटील, माजी सरपंच भिमाप्पा शिखरी, चंद्रकांत भोसले, भरत पाटील, सत्यपा पाटील, प्रभाकर लोहार, रावसाहेब नलवडे, दुडाप्पा भेंडीगिरी, दुडाप्पा पाटील, शिवगोंडा पाटील, रामगोंडा रामाजगोळ, आनंदा राऊत, सुरेश पाटील, कामांना पाटील, मल्लाप्पा पाटील, बाळू पाटील, मारुती पाटील, प्रकाश पाटील, हमीद पानारी, सर्व हकदार यांच्या, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57607 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top