
संक्षिप्त
फक्त फोटो व ओळ ः २१४३२
-------
२१४४२
जीएसटी विभागातर्फे सायकल फेरी
कोल्हापूर ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील जीएसटी विभागाच्या वतीने सायकल फेरी झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देवूनही कधीही प्रकाशात न आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना यानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. एकशे साठहून अधिक नागरिक फेरीत सहभागी झाले. केंद्रीय जीएसटी विभागाच्या १६ कर्मचाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश होता. आयुक्त नसीन अरशी, अप्पर आयुक्त राहूल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी झाली. धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, टीए बटालियन, शिवाजी विद्यापीठ मुख्य प्रवेशव्दार ते पुन्हा जीएसटी कार्यालय असा फेरीचा मार्ग राहिला. संयुक्त आयुक्त सबरीश, सहाय्यक आयुक्त किशोर गोहील, उपायुक्त श्रीकांत राऊत, श्रीकांत केकडे, विनोद तारळेकर, वरूण सिंह, कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे चेतन चव्हाण आदींचा सहभाग होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57633 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..