पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

पोकळ थकबाकी कमी न झाल्यास
वीज बिले भरणार नाही

यंत्रमागधारक आक्रमक; सवलतीची रक्कम बिलांत दाखवली

इचलकरंजी, ता. १२ ः नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तांच्या आदेशाला महावितरणकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार घडत आहे. वीज बिलातून पोकळ थकबाकी करण्याचा आदेश असतानाही त्याबाबत महावितरणने हातवर केले आहेत. पोकळ थकबाकीच्या प्रश्नावरून आज यंत्रमागधारक आक्रमक झाले.
पोकळ थकबाकी कमी झाली नाही तर वीज बिले न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
वस्त्रोद्योग धोरणानुसार वीज बिल सवलतीसाठी २७ एचपीवरील यंत्रमागधारकांची ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली होती. नोंदणी न करणा-या यंत्रमागाधारकांची वीज सवलत बंद केली होती. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी अशी दोन महिन्यांची बिले दुप्पट आली होती. मात्र नंतर वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या आदेशानंतर वीज दर सवलत पूर्ववत केली. मात्र दोन महिन्यांची पोकळ थकबाकी राहिली. वीज बिलातून पोकळ थकबाकी आल्यानंतर यंत्रमागधारकांना धक्का बसला. त्यानंतर मंत्री पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तांनी महावितरण कंपनीला पत्र देऊन बंद केलेल्या तारखेपासून वीज सवलत पूर्ववत केली आहे. त्यामुळे पोकळ थकबाकी रदद् करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र महावितरण कंपनीकडून अडेलतट्टू भूमिका घेतली आहे. अद्यापही वीज बिलांतून पोकळ थकबाकी दाखविण्यात येत आहे. याबाबत महावितरणकडून वरिष्ठ पातळीकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात येत आहे.
याबाबत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी पोकळ थकबाकी कमी झाली नाही तर बिले न भरण्याचा इशारा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना दिला. एकीकडे अनुदान थांबवितांना महावितरणकडून कार्यवाही केली. पण अनुदान पूर्ववत करण्याच्या आदेशाबाबत मात्र महावितरणकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याने यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे.

कोट
वस्त्रोद्य आयुक्तांच्या आदेशानंतरही वीज बिलातील पोकळ थकबाकी त्वरित कमी झाली नाही तर आम्ही वीज बिले भरणार नाही.
- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57634 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top