पान ५ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५ मेन
पान ५ मेन

पान ५ मेन

sakal_logo
By

21421

इचलकरंजी : येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयात माथाडी कामगार मजुरी वाढीबाबत सुरू असलेल्‍या बैठकीत कामगार प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकारी आणि माथाडी निरीक्षक.

माथाडींच्या मजुरी वाढीची ठोस निर्णय नाही

बैठक निष्फळ; काम सुरू झाल्यावरच वाढ देण्यावर असोसिएशन ठाम

इचलकरंजी, ता. १२ : ट्रान्सपोर्ट असोसिएशनने माथाडी कामगारांनी काम सुरू केल्याशिवाय मजुरी वाढबाबत निर्णय नाही, अशी भूमिका घेतल्याने माथाडी कामगार मजुरीवाढ व सूत बाचकी व कापड गाठीचे वजन ५० किलो पर्यत करावे, यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बोलविलेली बैठक निष्फळ ठरली. पुढील बैठक १९ मे गुरुवारी होणार असल्याची माहिती माथाडी निरीक्षक एस. बी. पुरीबुवा यांनी सांगितले. दरम्यान, माथाडी कामगारांनी पुढील बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. या वेळी माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकार्‍यांनी कामगारांनी अचानक काम बंद करणे कायदयास धरून आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर कामगार प्रतिनिधींनी यापूर्वी मजुरीबाबत केलेल्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. करार संपून दीड महिना झाला असून अद्याप ठोस निर्णय झाला नाही.
वाढत्या महागाईमुळे कामगारांना जगणे मुश्कील झाल्याने हे टोकाचे पाउल उचलल्याचे सांगण्यात आले. यावेळी शाब्दिक वादावादी झाल्याने कार्यालयातील वातावरण तंग बनले होते. कामगार प्रतिनिधींनी मजुरी वाढ निर्णय आज घ्या व गाठींच्या वजनाबाबत पुन्हा बैठक बोलवा, अशी भूमिका घेतली. मात्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाढ देऊ पण काम सुरू झाल्यानंतर या निर्णयावर ठाम राहिल्याने बैठक निष्फळ ठरली.
यावेळी माथाडी निरीक्षक पुरीबुवा यांनी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या सहमतीने पुढील तारीख दिली. मात्र या निर्णयावर माथाडी कामगार वर्गातून नाराजी उमटली होती. बैठकीस दीपक पाटील, शामराव कुलकर्णी, धोंडीराम जावळे, अशोक शिंदे, जितेंद्र जाणवेकर, शामरव लाखे, गंगाधर पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57646 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top