आरोग्य विभागात जम्‍बो भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागात जम्‍बो भरती
आरोग्य विभागात जम्‍बो भरती

आरोग्य विभागात जम्‍बो भरती

sakal_logo
By

आरोग्य विभागात
जम्‍बो भरती; मंत्री मुश्रीफ
--
क वर्गातील १० हजार पदे भरणार

कोल्‍हापूर , ता. १२ : जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीतर्फे करण्यात येत असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६ पदे, आरोग्य सेवक (पुरुष) याची ३,१८४ पदे आणि आरोग्य सेविकांची ६,४७६ पदे अशी एकूण १०,१२७ रिक्त पदांची भरण्यात येणार आहे. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण ४ लाख, २ हजार, १२ अर्ज प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जांद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदांबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्यासंदर्भात सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57663 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top