
अतिक्रमण निवेदन
पूर्वसूचना, कायदेशीर नोटीस
न बजावता एकतर्फी कारवाई
कदम, सूर्यवंशी, ढवळेंचे प्रशासकांना निवेदन
कोल्हापूर, ता. १२ ः बेकायदेशीर बांधकाम अथवा अतिक्रमण हटवण्याबाबत विरोध नाही; पण पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस न बजावता महापालिका प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई करण्यात आली. तसेच राजकीय सूडभावनेतून केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यापुढे कारवाई करताना राजकीय दबावास बळी न पडता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे निवेदन भाजपचे माजी नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, महापालिकेने बेकायदेशीर बांधकामे स्वतः ठरवून व्यापारी, रहिवाशांचे नुकसान केले आहे. मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत राजारामपुरीतील उद्यानात कार्यक्रम घेतला. त्यात राजारामपुरीचा विकास, सुशोभीकरण, वाहनतळ, इतर बाबींबाबत चर्चा झाली. दुसऱ्याच दिवशी महापालिका व पोलिस प्रशासनाने पूर्वसूचना न देता कारवाई केली. ती राजकीय सूडभावनेने केल्याची चर्चा राजारामपुरीतील व्यापारी वर्गात आहे. कारवाईला विरोध नाही, पण कायदेशीर नोटीस देऊन पट्टे मारून ठराविक मुदत देणे क्रमप्राप्त होते. पण तसे केलेले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57665 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..