अंबाबाई दान पेटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई दान पेटी
अंबाबाई दान पेटी

अंबाबाई दान पेटी

sakal_logo
By

‘संगीतोपचार'' ग्रंथाचे आज प्रकाशन
कोल्हापूर ः येथील प्रसिध्द करसल्लागार, माजी रोटरी गव्हर्नर डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित ‘संगीतोपचार'' या ग्रंथाचे प्रकाशन उद्या (शुक्रवारी) होणार आहे. हॉटेल सयाजी येथील बसंत हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द गायक महेश काळे, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, गुणिदास फाऊंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे, प्रसिध्द गायक विनोद डिग्रजकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अक्षर दालनचे अमेय जोशी यांनी केले आहे.
.............
अंबाबाईच्या दानपेटीत
पाऊण कोटीहून अधिक दान
कोल्हापूर ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांतील रकमेची मोजदाद कालपासून सुरू झाली आहे. आज दिवसभरात चार पेट्या उघडण्यात आल्या. त्यातून एकूण ४२ लाख ३५ हजार ९६७ रुपयांची रक्कम समितीकडे जमा झाली. काल दिवसभरात एक पेटी उघडण्यात आली. त्यामधून ३४ लाख ५८ हजार ४४० रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. दोन दिवसांत एकूण ७६ लाखांवर ही रक्कम जमा झाली असून आणखी दोन दिवस उर्वरित पेट्यांतील रक्कम मोजली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57673 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top