महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार
महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार

महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार

sakal_logo
By

महापालिका प्रभाग रचना
आज जाहीर होणार
कोल्हापूर, ता. १२ ः महापालिका निवडणुकीसाठी पहिला टप्पा असलेली व राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम झालेली प्रभाग रचना शुक्रवारी (ता. १३) जाहीर केली जाणार आहे. ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आज पुण्याला गेले. मार्चमध्ये महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेतील सहा प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्यास सांगितल्याने महापालिकेने ३१ प्रभाग तयार केले. ९२ सदस्यसंख्या झाली होती. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. ती आता पूर्ण केली जात आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना जाहीर करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आज गॅझेटमध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी पुण्याला गेले. ती जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर, तसेच चारही विभागीय कार्यालयात, निवडणूक कार्यालयात पाहण्यास उपलब्ध होणार आहे. पूर्वीच्या प्रभाग रचनेतील सहा प्रभागांमध्ये किरकोळ बदल होणार असल्याचे समजते. ते नेमके बदल काय आहेत, हे रचना जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रक्रियेनंतर मतदार यादी निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठीही प्रभागनिहाय मतदार यादी फोडून त्याबाबतच्या हरकती, सूचना मागवण्यात येऊन ती अंतिम केली जाणार आहे. त्याचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57684 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top