क्राईम दोन बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम दोन बातम्या
क्राईम दोन बातम्या

क्राईम दोन बातम्या

sakal_logo
By

मंगल कार्यालयातील
नुकसानप्रकरणी चौघांवर गुन्हा
कोल्हापूर ः लिशा हॉटेल चौकात राजगौरव मंगल कार्यालयात भाडेतत्त्‍वावर दिलेला जनरेटर घेवून जातेवेळी येथील मालमत्तेचे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. किचन, टॉयलेट, बाथरुमच्‍या भिंती तोडून १ लाखांचे नुकसान व दमदाटी केल्‍याप्रकरणी सुभाष केशव सावंत (रा. कदमवाडी रोड) याच्‍यासह चौघांवर गुन्‍हा दाखल झाला. दीपक कन्‍हय्‍यालाल केशवाणी (वय ४८, रा. ताराबाई पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिल्‍याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी केशवाणी यांनी सावंत यांचा हॉल भाडेतत्त्‍वावर चालविण्‍यास घेतला आहे. हॉलमध्‍ये सावंत याच्‍या मालकीचा जनरेटर होता. बुधवारी दुपारी सावंत याच्‍यासह अनोळखी चौघे विनापरवानगी कार्यालयात आले. येथील जनरेटर घेवून गेले.

राजेंद्रनगरात तरुणास मारहाण
कोल्‍हापूर : राजेंद्रनगर येथे पाण्‍याच्‍या कारणावरुन झालेल्‍या वादात शोएब सिकंदर शेख (वय २१, झेंडा चौक, राजेंद्रनगर) याला मारहाण केली. गुरुवारी सकाळी साडेदहाच्‍या सुमारास हा प्रकार घडला. त्‍याला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्‍याचे काम सुरु होते.
-------------
दुचाकीवरुन पडून
महिला जखमी
कोल्‍हापूर : भादोले (ता. हातकणंगले) येथे दुचाकीचा ताबा सुटल्याने गतिरोधकावर पडून महिला जखमी झाली. अश्‍विनी अभिनंदन जाधव (वय २६, रा. उत्तरेश्‍वर पेठ) असे त्‍यांचे नाव आहे. पतीसोबत त्‍या दुचाकीवरुन तासगावकडे निघाल्‍या होत्‍या. त्‍यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

अपघातात दोघे जखमी
कोल्‍हापूर : उमा टॉकीज परिसरातील ओढ्याच्‍या गणपती मंदिरासमोर काल रात्री अकराच्या सुमारास झालेल्‍या अपघातात दोघे जखमी झाले. वैभव संजय कांबळे (वय २१, रा. मंगळवार पेठ) व यश संतोष कारंडे (१८, रा. शाहूपुरी) अशी जखमींची नावे आहेत दोघांना स्थानिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57689 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top