बंदुकीसह काडतूस जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदुकीसह काडतूस जप्त
बंदुकीसह काडतूस जप्त

बंदुकीसह काडतूस जप्त

sakal_logo
By

21449
कोल्हापूर ः धबधबेवाडी (ता.पन्हाळा) येथील विनापरवाना बारा बोअरची बंदूक व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. यावेळी संशयित संजय उर्फ डॉन मामा दिनकर पोवार.

विनापरवाना बारा बोअरची
बंदूक धबधबेवाडीत जप्त
कोल्हापूर ः धबधबेवाडी (ता.पन्हाळा) येथे विनापरवाना बारा बोअरची एक बंदूक व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज जप्त केला. या प्रकरणी संजय उर्फ डॉन मामा दिनकर पोवार (वय ५२,रा.धबधबेवाडी) याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले, की संजय पोवार हा बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक व काडतुसे बाळगून गल्लीत वावरत होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह पोलिसांनी धबधबेवाडी येथे जावून कारवाई केली.


मोबाईल हॅक करून
चार लाखांची फसवणूक
कोल्हापूर - मामेभावाचा मोबाईल हॅण्डसेट हॅक करून फिर्यादीची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना येथे घडली. याबाबत जयदीप कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी यांचा मामेभाऊ दर्शन पंडित यांचा मोबाइल हॅक केला. मामेभाऊ असल्याचे भासवून त्यांचा विश्‍वास संपादन केला. यांना मोबाईलवर मॅसेज पाठविले. यातून फिर्यादीच्या बॅंक खात्यातील चार लाख रुपये संशयित आरोपी जयदीप कुमार याने बॅंक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. २९ एप्रिलच्या दुपारी सव्वाबारा ते रात्री नऊ दरम्यान जुना पुणे-बंगळूर महामार्ग येथे ही फसवणूक झाल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. या फसवणूक प्रकरणी साधना घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.

मोबाईल शॉपी फोडून
७० हजारांची चोरी
कोल्हापूर- सुभाषनगर परिसरातील मोबाईल शॉपीचे पत्र्याचे शेड उचकटून चोरट्याने सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
यामध्ये मोबाईल हॅण्डसेट, सीपी ब्लुटुथ, स्पीकर, हेडफोन, ग्लुगन मशिन, मॉनिटर, हार्ड डिस्क, डाटा केबल, मोबाईल चार्जर, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह यांचा समावेश आहे. तसेच रोख दोन हजार रुपयेही चोरट्याने लंपास केले. काल रात्री या प्रकरणी स्वप्नील प्रभाकर दळवी (वय ३६ रा. साळोखे पार्क) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दीड लाखांचे दागिने लंपास
कोल्हापूर - कसबा बावड्यातील धनगर गल्लीत चोरट्याने १ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. भाड्याने राहणाऱ्या शकुंतला खरपे यांच्या घरात ही चोरी झाली. चोरट्याने सोन्याची चेन, लक्ष्मीहार, चांदीचे पैंजण, जोडवी लंपास केला आहे. या प्रकरणी राहुल खरपे (वय २७ रा.धनगर गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरपे यांची आई शकुंतला या एकट्या घरात असताना चोरट्याने महिनाभरापूर्वी दागिने चोरून नेले. याची माहिती आज समजल्यानंतर खरपे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57705 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top