अनिलकुमार काशिद गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिलकुमार काशिद गौरव
अनिलकुमार काशिद गौरव

अनिलकुमार काशिद गौरव

sakal_logo
By

21448
मेजर जनरल अनिलकुमार
काशीद यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः मेजर जनरल अनिलकुमार काशीद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित कले. श्री. काशीद दिंडनेर्ली गावचे आहेत. अनिलकुमार काशीद यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि त्यानंतर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतून शिक्षण पूर्ण केले आहे. डिसेंबर १९८६ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. तोफखाना दलात त्यांनी सेवा बजावली. त्यांनी अरुणाचल प्रदेशात चीन सीमेला लागून असलेली ताबा रेषा आणि जम्मू काश्‍मीर आणि पाकिस्तान दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सेवा बजावली. चिनी सीमेवर त्यांनी तोफखान्याच्या नेतृत्वासह अतिउंचीवरील पायदळातही सेवा बाजवली आहे. इन्फंट्री डिव्हिजनच्या प्रमुख पदाची सूत्रे त्यांनी सांभाळली. त्यानंतर त्यांची लष्कराच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात गुप्तचर संचालनालयात अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी गौरवले आहे. दरम्यान, अनिलकुमार यांचे वडील नारायण काशीद यांनी हवाई दलात सेवा बजावली आहे. १९७१ च्या युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. त्यांचे चिरंजीव मधुकर व अनिलकुमार यांनी लष्करात मेजर जनरल पदावर कामगिरी बजावली. मधुकर काशीद मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. त्यांनाही विशिष्ट सेवा पदक मिळाले. तर, अनिलकुमार यांनाही विशिष्ट सेवा पदक मिळाले आहे. मधुकर काशीद यांचे चिरंजीव अमित काशीद हे कर्नल असून सध्या ते पाकिस्तानच्या सीमेवर कार्यरत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57710 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top