गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

ओंकारच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील गृहशास्त्र व कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांनी शारदा बेकर्स, हर्ष एंटरप्रायजेस गारमेंट व गोकुळ दूध संकलन केंद्र लिंगनूर या ठिकाणी अभ्यास भेट दिली. लघु उद्योगातील समस्या व उपाय यावर उद्योजक सुरेखा येसादे, अधिकारी चंद्रकांत चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यासाठी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्र प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे प्रोत्साहन तर विभागप्रमुख डॉ. गंगासागर चोले, डॉ. महेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------
21462
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फार्मासिटीकल इन्स्टिट्यूटला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थी व रुपेश गावडे.

‘घाळी’च्या विद्यार्थ्यांची फार्मा इंडस्ट्रिजला भेट
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे एमएस्सी भाग एकच्या विद्यार्थ्यांची फार्मासिटीकल व केमिकल अ‍ॅनालॉटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट दिली. या वेळी कार्यशाळा झाली. अभ्यासक्रम व फार्मा क्षेत्राशी निगडित विविध उपकरणांची प्रात्यक्षिक व उपकरणांची माहिती देण्यासाठी ही भेट आयोजिली होती. इन्स्टिट्यूट प्रमुख रुपेश गावडे यांनी विविध उपकरणांची माहिती दिली. प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्यासह डॉ. के. एन. पाटील, प्रा. एस. डी. जाधव, प्रा. ए. जी. गोडघाटे यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा. आर. एम. पाटील, प्रा. एस. एन. जाधव, प्रा. एस. एस. माने उपस्थित होते.
-------------------
21463
गडहिंग्लज : परिचारिका सत्कारप्रसंगी डॉ. बसवराज कडलगे, धोंडीबा हळदकर, दयानंद पोवार, विश्‍वनाथ धूप आदी.

लोकमंगलमध्ये परिचारिका दिन
गडहिंग्लज : येथील लोकमंगल समूहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केसरकर हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिक दिन झाला. कॅन्सरतज्‍ज्ञ डॉ. बसवराज कडलगे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. शाखा सल्लागार धोंडीबा हळदकर, शाखाधिकारी दयानंद पोवार यांची भाषणे झाली. परिचारिकांचा सत्कार हळदकर, राजेंद्र रणदिवे, विश्‍वनाथ धूप, कलगोंडा पाटील, आनंदराव आसवले, आनंद क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. श्रृती नेसरीकर, सीमा पोवार, शुभांगी कमतनुरे, काशाक्का कांबळे, दिपाली कांबळे, प्रेमा बागडी, गीता तरवाळ, अर्चना सुतार, जयश्री असोदे, राजू कुरळे, सागर पाटील उपस्थित होते. शाखाधिकारी दयानंद पोवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57724 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top