तोतया पोलिसांच्या भूलथापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पोलिसांच्या भूलथापा
तोतया पोलिसांच्या भूलथापा

तोतया पोलिसांच्या भूलथापा

sakal_logo
By

बचके रहना रे बाबा...
भामट्यांच्या भूलथापा ः सर्वसामान्यांना फटका ; प्रबोधनाची मोहीम राबविण्याची मागणी

राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः आम्ही पोलिस आहोत, पुढे मोठी चोरी झाली आहे. तुमचे दागिने काढून कागदात बांधा आणि पिशवीत ठेवा... सर्रास याच पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार वाढू लागलेत. संबधित भामट्यांच्या मुसक्या आवळण्याबरोबर आता पोलिस यंत्रणेने प्रबोधनाची मोहीमही हाती घेण्याची गरजआहे.
वाढत्या महागाईबरोबर सोन्याच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. आजकाल अर्धा एक तोळ्याचा दागिना खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भामटे अशाच दागिन्यांवर भरदिवसा डल्ला मारू लागलेत. ते निर्जनस्थळी आपले सावज शोधतात. सर्वसाधारण ती ज्येष्ठ व्यक्ती असते. मोटारसायकलवरून ते संबधितांना गाठतात. पोलिस असल्याची बतावणी करत पुढे चोरी अगर दरोडा पडला आहे. तुमच्याजवळील दागिने पुडीत बांधून पिशवीत ठेवा अशा भूलथापा देतात आणि किमंती दागिन्यावर हातोहात डल्ला मारतात.
शहरात दोन एक वर्षात नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कसबा बावडा, शालीनी पॅलेस परिसर आदी भागात असे प्रकार घडले आहेत. यामधील अनेक प्रकाराचा छडा यंत्रणेने लावून भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, अशा प्रकारांना कायमचा ब्रेक लागलेला नाही. पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्यांकडे ओळखपत्राची विचारणा करायला हवी, गजबजलेल्या रस्त्यावर चोरी अगर दरोडा पडला असेल तर तेथे पोलिसांचा फौजफाटा का नाही?, पोलिस कधी अंगावरील दागिने काढून पुडीत बांधण्यास सांगतिल का? अशा साध्या शंका सर्वसमान्यांच्यात मनात का येत नाहीत. कारण त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे. याचाच फायदा भामटे उठवू लागले आहेत. पोलिस यंत्रणेने भामट्याविरोधात कारवाईबरोबर व्यापक प्रबोधनाची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी ज्येष्ठांतून जोर धरू लागली आहे.
------
चौकट -
हे आवश्‍यक...
-फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत फलक लावावेत
-सोशल मीडियाआधारे नागरिकांचे प्रबोधन करावे
-ज्येष्ठांशी संवाद साधून सावधानतेबाबत माहिती द्यावी
-
चार्ट
जबरी चोरी गुन्ह्यांचे जिल्ह्यातील चित्र

२०१९ २०२० २०२१
दाखल उघड दाखल उघड दाखल उघड

१४२ १०६ १०३ ८३ १२१ ७९

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57728 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top