पाणी गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी गळती
पाणी गळती

पाणी गळती

sakal_logo
By

21588

चंबुखडी टाकीकडे जाणाऱ्या
पाईपलाईनला पाच ठिकाणी गळती

दिवसभरात दुरूस्ती पूर्ण, निम्म्या शहरातील पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर, ता.१३ ः बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी टाकीकडे जाणाऱ्या पाईपलाईनला आज सकाळी पाच ठिकाणी गळती लागली. मोठ्या प्रमाणावर वाया जात असलेल्या पाण्यामुळे तातडीने उपसा केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर दुपारी चारवाजेपर्यंत सर्व गळती दुरूस्त केल्या. त्यामुळे ए, बी, सी, डी वॉर्डला अपुरा पाणीपुरवठा झाला.
या पाईपलाईनवरील गळती काही दिवसापूर्वीच दुरूस्त केली होती. त्याच पाईपलाईनला आज सकाळी सातच्या सुमारास पाच वेगवेगळ्या ठिकाणी गळती उद्भवली. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत असल्याने पाणी वाया जाऊ नये यासाठी पाणी उपसा बंद केला. त्यामुळे चंबुखडी टाकीवर अवलंबून असलेल्या चार वॉर्डमधील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला. अनेक भागात सकाळच्या तसेच सायंकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहिला होता. अचानक बंद झालेल्या पाणीपुरवठ्याने नागरिकांची धावपळ उडाली. पाणीपुरवठा विभागाने पाईपलाईनची दुरूस्ती तातडीने हाती घेतली. दुपारी चारवाजेपर्यंत सर्व गळती दुरूस्त केल्या. तसेच तीनही पंप पूर्ण क्षमतेने सुरू केले. त्यामुळे चंबुखडीची टाकीची पाणी पातळी रात्रीपर्यंत पूर्ण करून पाणीपुरवठा केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57739 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top