बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल; तीन वर्षांनंतर आले उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल; तीन वर्षांनंतर आले उद्दिष्ट
बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल; तीन वर्षांनंतर आले उद्दिष्ट

बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल; तीन वर्षांनंतर आले उद्दिष्ट

sakal_logo
By

बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल
तीन वर्षांनंतर आले उद्दिष्ट : दीड लाखांचे मिळणार अनुदान
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात बांधकाम कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी प्रधानमंत्री आवास योजनेतून कित्येकांची घरकुले त्यांनी उभारली. पण, बांधकाम कामगारांना स्वत:चे घरकुल उभारणीसाठी अनुदानाची प्रतीक्षा होती. ती संपली असून तीन वर्षांनंतर अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) उद्दिष्ट आले आहे. जिल्ह्याला १२० घरकुलांचे उद्दिष्ट असून या योजनेंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी दीड लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे.
प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीही सुरू आहे. या घरकुलांची उभारणी करणाऱ्या बांधकाम कामगारांना घरकुल उभारणीसाठी कोणती योजनाच नव्हती. त्यामुळेच शासनाने अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू केली. पहिल्या वर्षी लाभार्थ्यांची निवड करून लाभही देण्यात आले. मात्र, त्यानंतर गेली तीन वर्षे या योजनेसाठी निधीच उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे बांधकाम कामगार योजनेच्या लाभापासून वंचित होते.
दरम्यान, यंदा अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे उद्दिष्ट आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यात गडहिंग्लज तालुक्यात नऊ घरकुलांचे उद्दिष्ट आले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दीड लाख रुपये अनुदान मिळणार आहे. घराच्या पूर्ततेच्या टप्प्यानुसार पाच हप्त्यांत अनुदान दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा ३० हजार रुपये अधिक अनुदान मिळणार आहे. मात्र, बांधकाम कामगारांना ‘नरेगा’चा लाभ मिळणार नाही. कुशल कामगार असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणे लाभ नाकारण्यात आला आहे.
----------------
चौकट
गडहिंग्लजला राज्यातील पहिले घरकुल...
केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी अटल बांधकाम कामगार आवास योजना आणली. या योजनेत राज्यातील पहिले घरकुल मंजूर होण्याचा मान गडहिंग्लज तालुक्याला मिळाला होता. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील बांधकाम कामगाराला योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, त्यानंतर अनुदानच बंद झाल्याने बांधकाम कामगार वंचित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57764 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top