
कन्या महाविद्यालयात कराटे वर्ग
21484
कन्या महाविद्यालयात कराटे वर्ग
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन ॲड. दिलशाद मुजावर यांच्या हस्ते झाले. मुलींना त्यांनी स्वावलंबन, सजगता, शारीरिक व मानसिक सक्षमीकरण यांचे महत्त्व पटवून दिले. सौ. किरण चौगुले यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थिनी संघटना, महिला सबलीकरण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहे. सूत्रसंचालन डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. यावेळी क्रीडा विभागप्रमुख डॉ. सविता भोसले यांसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आभार प्रा. संगीता पाटील यांनी मानले.
----------
नाईट कॉलेजमध्ये व्याख्यान
इचलकरंजी : सक्षम उद्योजक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कल्पकता, सृजनशीलता व नावीन्यता अशी कौशल्ये विकसित करणे काळाची गरज आहे, असे मत डॉ. राजू श्रावस्ती यांनी व्यक्त केले. नाईट कॉलेजमधील वाणिज्य व नियोजन मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नारे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सौ. एस. ए. पौडमल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. एस. एल. रणदिवे यांनी करून दिला. आभार व सूत्रसंचालन प्रा. एन. ए. पाटील यांनी केले. या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
-----------
माऊली मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण
इचलकरंजी : येथील आमराई रोडवरील माऊली मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व मंचरी गाथा भजन होणार आहे. गुरुवारी विवेकानंद वासकर महाराज व गुरूवर्य तेजस वासकर महाराज यांच्या पुण्य स्मरणार्थ आयोजन केले आहे. रविवारी (ता. १५) ते शनिवार (ता. २१) दरम्यान होणार आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तुकोबाराय मंचरी गाथा भजन, हरिपाठ, सायंकाळी प्रवचन व कीर्तन, रात्री हरि जागर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---------
इचलकरंजीत आज रक्तदान शिबिर
इचलकरंजी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर होणार आहे. शनिवारी (ता. १४) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत शिबिर उत्पादन शुल्क कार्यालय, भगतसिंग बागेजवळ होणार आहे. शहर व परिसरातील हॉटेल्स व परमिट रूम असोसिएशन, मद्य विक्री असोसिएशन यांच्या संयुक्त सहभागातून राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
----------
शाहिरी पोवाडा कार्यक्रम सोमवारी
इचलकरंजी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाजारांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी सात वाजता ना. बा. घोरपडे नाट्यगृहात शाहिरी पोवाडा होणार आहे. शिवशाहू पोवाडा मंच, विश्व शाहीर परिषद, कोल्हापूर जिल्हा शाहिर परिषदेच्या वतीने या शाहू पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सात वाजता पोवाडा व नाट्यीकरण यांच्या माध्यमातून साकारलेला राजर्षी शाहू गाथा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये १८ कलाकारांचा सहभाग असून राजर्षी शाहूंच्या जीवनातील शेवटच्या पंधरा वर्षांतील महत्त्वाचे प्रसंग व घटना यांचा ५० मिनिटांचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लोकसंस्कृतीचा नृत्य गीतमय जागर करणारा लोकरंग हा कार्यक्रम होईल. ना. बा. घोरपडे नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57774 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..