टेक्नोक्रॅट २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेक्नोक्रॅट २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
टेक्नोक्रॅट २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

टेक्नोक्रॅट २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

21501
---------------
टेक्नोक्रॅट २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
शरद पॉलिटेक्निकमध्ये आयोजन; स्पर्धेत ६२२ विद्यार्थी सहभागी
दानोळी, ता. १३ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट २०२२ या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ६२२ पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेचे उद्‍घाटन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. बागणे म्हणाले, ‘‘स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमधून नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि नवउद्योजक विविध क्षेत्रामध्ये ठसा उमटवतील. शरद पॉलिटेक्निकलने अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.’’
स्पर्धेत इलेक्ट्रिकल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘इंडस्ट्रीअल एअर क्वॉलिटी मॉनिटर अॅण्ड कंट्रोल युजिंग सोलार पॉवर’ या प्रकल्पास, मेकॅनिकल विभागात ‘आयओटी बेस्ड व्हर्च्युअल डॉक्टर रोबोट’ या प्रकल्पास, सिव्हिल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘ग्रीन कॅम्पस डेव्हलपमेंट’ या प्रकल्पास, कॉम्प्युटर विभागात ‘आयसीयु मॉनिटरिंग सिम’ या प्रकल्पास, आय टी विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘ऑटोमेटिक इरिगेशन सिस्टीम युजिंग आयओटी’ तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात ‘इनोव्हेटीव्ह फ्युचरिस्टीक इव्ही चार्जिंग स्टेशन युजिंग एआय इम्पलीमेंटेंशन्स विथ झिरो कार्बन इमिशन्स’ या प्रकल्पांना प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मिनी प्रोजेक्ट स्पर्धाही झाल्या.
विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वय प्रा. ए. के. मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर. आर. पाटील यांनी केले. आभार एस. एस. माळी यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57783 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top