बेंद्रे यांच्या इतिहास ग्रंथाचे पुनर्प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेंद्रे यांच्या इतिहास ग्रंथाचे पुनर्प्रकाशन
बेंद्रे यांच्या इतिहास ग्रंथाचे पुनर्प्रकाशन

बेंद्रे यांच्या इतिहास ग्रंथाचे पुनर्प्रकाशन

sakal_logo
By

वा.सी.बेंद्रे यांच्या सहा ग्रंथांचा
उद्या प्रकाशन सोहळा
-----
डॉ. मगदूम-नाईक ; एकाच वेळी ६ ऐतिहासिक संदर्भाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. १३ : इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.१५) शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते दुपारी दोन वेळेत होत आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, डॉ. जयसिंगराव पवार, इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे यांच्या नात साधना बेंद्रे यांच्या हस्ते प्रकाशन होईल,अशी माहिती मराठीदेशा फाऊंडेशनचे डॉ. दामोदर मगदूम-नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. मगदूम म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी ६ ऐतिहासिक संदर्भ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होत आहे. या ग्रंथांत ''मालोजीराजे आणि शहाजी महाराज'', ''छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध व उत्तरार्ध)'', ''छत्रपती संभाजी महाराज'', ''छत्रपती राजाराम महाराज'', ''राजाभिषेकप्रयोग'' हे ग्रंथ ‘मराठीदेशा’तर्फे प्रकाशित होतील. प्रकाशित होणारी सहा पुस्तके पूर्णपणे नव्या रूपात, काही मूळ पत्रांसहित (मूळ मोडी पत्रांची छायाचित्रे आणि मराठी लिप्यंतरासहित) आणि क्राऊन (मोठ्या) साईजमध्ये प्रकाशित होत आहेत. या सहा पुस्तकांपैकी एक असलेले छत्रपती राजाराम महाराज हे दुर्मिळ पुस्तकं ५० वर्षांनी परत एकदा नव्याने प्रकाशित होत आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठांसाठी शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांची नवी तैलचित्रे बनवली आहेत.
डॉ. मगदूम म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ग्रंथात श्री. बेंद्रे यांनी शोधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्लॅक अँड व्हाईट स्केच मराठीदेशातर्फे रंगीत स्वरूपात नव्याने प्रकाशित केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीवेळी हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले होते. श्री. बेंद्रे यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ चित्र उपलब्ध झाले. मराठीदेशा फाउंडेशनने मूळ कृष्णधवल स्वरूपात असलेले हे चित्र डिजिटल टूल्सचा वापर करून हुबेहूब चित्र बनविले. कार्यक्रमात या चित्राचे अनावरण होईल. तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे पहिलेच चित्र ‘मराठीदेशा’तर्फे प्रथमच प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजावरील ग्रंथ नव्या रूपात प्रकाशित केला जाईल. त्यांचे तेंगणापट्टणम तामिळनाडू येथील युद्धातलं भारदस्त चित्र या कार्यक्रमात प्रकाशित केले जाईल. पत्रकार परिषदेला भगवान चिले, अश्‍विन निगवेकर, इंद्रजित माने, अभिजित दुर्गळे, साताप्पा कडव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57784 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top