‘कामगार कार्यालय’ समस्यांच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कामगार कार्यालय’ समस्यांच्या गर्तेत
‘कामगार कार्यालय’ समस्यांच्या गर्तेत

‘कामगार कार्यालय’ समस्यांच्या गर्तेत

sakal_logo
By

21510
-------------
‘कामगार कार्यालय’ समस्यांच्या गर्तेत
अपुऱ्या जागेसह गळके छत; महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची शक्यता
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १३ : हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कामगारांच्या समस्या मार्गी लावणारे सहायक कामगार आयुक्त कार्यालय अपुऱ्या जागेच्या समस्येशी झगडत आहे. सध्या वळवाचा पाऊस सुरू झाल्याने तर कर्मचाऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाळ्यामध्ये कार्यालयाच्या छतामधून टिपकणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. कार्यालयामध्ये अर्ज, दप्तर, कामगारांचे रेकॉर्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य साहित्य कार्यालयाबाहेर पडलेले दिसते. कार्यालयाच्या अपुऱ्या जागेच्या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांकडून अपेक्षित हालचाली होताना दिसत नाहीत. परिणामी कर्मचारी अनेक वर्षांपासून दाटीवाटीने कामकाज करताना दिसतात.
इचलकरंजी शहरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालय हे नगरपालिका मालकीच्या राजाराम स्टेडियममधील जागेत स्थित आहे. कामगार कार्यालय पालिकेस भाडेपोटी वर्षाकाठी ३८ हजार ४८० रुपये देते. त्याअनुषंगाने पालिकेकडून या वास्तूची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ती खराब होत आहे. त्यामुळे या वास्तूत असणाऱ्या अन्य कार्यालयांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सध्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील २५ हजार ५४३ बांधकाम कामगारांची नोंद आहे. १६ हजार जीवित नोंदी आहेत. यासोबत माथाडी व अन्य कामगारांची संख्याही मोठी आहे. कामगारांच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या या कामगार आयुक्त कार्यालयाचीच अवस्था खराब झाली आहे. कार्यालयात कामगारांचे रेकॉर्ड जतन करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. याआधीही पावसाळ्यामध्ये छतामधून आत येणाऱ्या पाण्यामुळे अनेक रेकॉर्ड भिजून खराब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये छतातून पडणाऱ्‍या पाण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्‍यांना दाटीवाटीने बसून कामकाज पहावे लागत आहे. कार्यालयाने जागे अभावी कार्यालयाचे काही साहित्य बाहेरील जिन्या खाली ठेवले आहे. हे साहित्य अनेक दिवस बाहेर राहिल्याने त्यातील अधिकतर खराब झाले आहे.
-------------
कार्यालय स्थलांतराचे प्रयत्न
कार्यालयाने २०१७ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेकडे जागेची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने ही जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमधील जागेसाठी हिरवा कंदील दिला होता. मात्र, कामगार कार्यालयाच्या संथ गतीच्या हालचालीमुळे पालिका प्रशासनाने त्यातील काही भाग पासपोर्ट विभागाला दिला आहे. त्यामुळे बांधकाम कार्यालयासमोर पुन्हा अपुऱ्या जागेचा प्रश्न उभा राहिला. सध्या के. एल. मलाबादे चौकातील पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील जागेमध्ये कार्यालय स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57791 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top