मांगनूरच्या हिंदमाता सोसायटीचे सावंत अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांगनूरच्या हिंदमाता सोसायटीचे सावंत अध्यक्ष
मांगनूरच्या हिंदमाता सोसायटीचे सावंत अध्यक्ष

मांगनूरच्या हिंदमाता सोसायटीचे सावंत अध्यक्ष

sakal_logo
By

21516
शंकर सावंत, दिनकर शिंगटे

मांगनूरच्या हिंदमाता सोसायटीचे
सावंत अध्यक्ष; शिंगटे उपाध्यक्ष
गडहिंग्लज, ता. १३ : मांगनूर तर्फ सावंतवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हिंदमाता विकास संस्थेच्या अध्यक्षपदी शंकर सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी दिनकर शिंगटे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध होऊन आमदार राजेश पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर गटाची सत्ता कायम राहिली. पॅनेलप्रमुख प्रकाश पाटील व महादेव शिंगटे यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवडप्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी सावंत यांचे नाव प्रकाश पाटील यांनी सुचविले, तर महादेव शिंगटे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शिंगटे यांचे नाव तानाजी चव्हाण यांनी सुचवून कासेवा सावंत यांनी अनुमोदन दिले. तुकाराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नूतन अध्यक्ष सावंत यांनी आभार मानले. सचिव जितेंद्र जाधव यांनी निवडीचे कामकाज पाहिले. या वेळी सचिन घुगरे, अर्जुन पाटील, मधुकर कांबळे, गंगाराम लोहार, जनाबाई करडे व संचालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57796 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top