
खरीप हंगामाची तयारी, भाजीपाला बियाणे उपलब्ध
फळभाज्या, पालेभाज्यांचे बियाने उपलब्ध
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून, फळभाज्या, पालेभाज्यांसाठी लागणारे बियाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. असे असले तरी पालेभाज्या अन् फळभाज्यांच्या बियाणांमध्ये यावर्षी पाच ते दहा टक्के वाढ झाल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली.
खरीप असो की, रब्बी हंगाम. शेतकरी हे पालेभाज्यांचे बियाणांचे वाण घेण्यासाठी कोल्हापूरच्या बाजारपेठेत येतात. पडवळ, दूधी भोपळा, पालक, मेथी, चाकवत, बंदरी गवारी, देशा गवारी, भेंडी, कारले, काकडी, बीट रुट, मिरची, धने, पडवळ, लाल पोकळा, जमिन मुळा, श्रावण घेवडा, शेपू अशा पालेभाज्या, फळभाज्यांची बियाणे मिळतात. विविध कंपन्या बीजे तयार करुन बाजारपेठेत आणतात. दोन ते अडीच वर्षे कोरोनाचा कालखंड झाला. अशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली. ट्रान्स्पोर्टेशनचा खर्च वाढला. परिणामी, संबंधित कंपन्यांनी या बियाणांमध्ये एक किलोप्रमाणे दर वाढवले.
कोणताही शेतकरी जेव्हा पालेभाज्यांचे बियाणे पेरतो, तेव्हा शेतकऱ्याचा प्लॉट किती मोठा यावर बी घेतले जाते. काहीवेळा अशा बियाणांचा तुटवडा जाणवतो. गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सुर्यफुलाचे बियाणे मिळत नव्हते. संबंधित कंपनीने सुर्यफुलाचे बियाणे बाजारपेठेत आणले नव्हते. परिणामी, शेतकऱ्यांनी सुर्यफुलाचे उत्पादन कमी घेतले. हाच नियम अन्य पालेभाज्या, फळभाज्यांच्या बाबतीत ही लागू आहे. म्हणजे, मंडईत कांदापात, कारले आदी भाजींचा काहीवेळा तुटवडा जाणवतो. तेव्हा विक्रेते म्हणतात, की शेतकऱ्यांनी मार्केट समितीत या भाज्या आणल्या नाहीत.
चौकट
पारंपरिक बियाणे कुठे आहे?
पूर्वी लाल पोकळा, दोडका, कारली, पडवळ, गवारी, मिरची अशा बियाणांचे संवर्धन, संरक्षण केले जायचे. हे बियाणे बिवाळ्याअंतर्गत टोपल्यात, कणगीत, बांबूच्या टोपलीत, पोकळ बांबूमध्ये ठेवले जायचे. हे बियाणे ठेवण्यापूर्वी त्यामध्ये राख मिसळली जायची. जेणेकरुन आळी, टोका लागू नये. बियाणे खराब होऊ नये, अशी काळजी घेतली जायची. ही पारंपरिक बियाणांची बँक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट कोल्हापुरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित कंपनीच्या बियाणांचे वाण विकत घ्यावे लागत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57819 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..