अंबाबाई परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई परिसर
अंबाबाई परिसर

अंबाबाई परिसर

sakal_logo
By

पालकमंत्र्यांनी सांगितले तरच
कारवाई होणार काः ठाणेकर

अंबाबाई मंदिर परिसरात विनापरवाना व्यवसाय

कोल्हापूर, ता. १३ ः पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून फक्त राजारामपुरीत कारवाई करणारे प्रशासन अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, विनापरवाना यात्रीनिवास, बंदिस्त पार्किंग, विनापरवाना नळ जोडण्या याकडे लक्ष देणार की नाही, असा सवाल भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला.
पत्रकात म्हटले आहे, की अंबाबाई मंदिरातील पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर यात्री निवास व लॉजिंग सुरू झाली आहेत. अनेक यात्री निवास विनापरवाना सुरू आहेत. काहींनी पार्किंग बंदिस्त करून यात्री निवास सुरू केले आहेत. रहिवासी वापर दाखवलेल्या इमारतींत यात्री निवास आहेत. बांधकामात विनापरवाना बदल केले आहेत. एक तीन मजली इमारतच विनापरवाना बांधली आहे. अनेकांनी विनापरवाना अथवा घरगुती वापर दाखवून नळ जोडण्या घेतल्या आहेत. याकडे लक्ष वेधूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. काही ठराविक अधिकारी विनापरवाना आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांशी हात मिळवणी करून महापालिकेचे नुकसान करत आहेत. यामुळे नियम व अटी पाळून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तेही विनापरवाना व्यवसायास सुरवात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाद्वार रोड, ताराबाई रोडवरील अनेक दुकानदार व फेरीवाल्यांच्या अतिक्रमंणामुळे रस्त्यावर चालणेही मुश्किल बनले आहे. अतिक्रमण निर्मूलनासारख्या दैनंदिन कामासाठी पालकमंत्र्यांनी आदेश देणे यात प्रशासनाचा कर्तत्वशून्यपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येतो. तसेच पालकमंत्र्यांनी सांगितले तरच अतिक्रमण निर्मूलन होणार का?

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57835 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top