संशोधन वृत्ती, व्यावसायिकतेतून प्रगती साधा : डॉ. परशराम पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधन वृत्ती, व्यावसायिकतेतून प्रगती साधा : डॉ. परशराम पाटील
संशोधन वृत्ती, व्यावसायिकतेतून प्रगती साधा : डॉ. परशराम पाटील

संशोधन वृत्ती, व्यावसायिकतेतून प्रगती साधा : डॉ. परशराम पाटील

sakal_logo
By

21543
चंदगड ः र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना डॉ. परशराम पाटील. शेजारी प्राचार्य डॉ. पाटील, प्रा. सावंत.

संशोधन वृत्ती, व्यावसायिकतेतून
प्रगती साधा : डॉ. परशराम पाटील
‘माडखोलकर’मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः जैवविविधतेचे स्त्रोत टिकवून ठेवले पाहिजेत. नैसर्गिक संसाधनांचा कौशल्याने आणि जपून वापर करायला हवा. संशोधन वृत्ती आणि व्यावसायिक दृष्‍टिकोनातूनच प्रगती साधणे शक्य होईल, असे मत स्टार्ट अप इंडियाचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्रकल्प अधिकारी प्रा. एस. के. सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम महत्त्‍वपूर्ण आहेत. महाविद्यालयाने ते देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.’’ प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला करून प्रगतीच्या दृष्टीने आत्मनिर्भर व्हायला हवे. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव द्यायला हवा. कृषी क्षेत्राशी संबंधित संशोधनपर वृत्ती अंगी बाळगून त्यामध्ये प्रयोगशीलता आणायला हवी.’’ या वेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पूजा देशपांडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57848 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top