
गवसेच्या पावणाईदेवी संस्थेत परिवर्तन
गवसेच्या पावणाईदेवी संस्थेत परिवर्तन
चंदगड, ता. १३ ः गवसे (ता. चंदगड) येथील पावणाईदेवी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले. सत्ताधारी पावणाईदेवी शेतकरी विकास आघाडीकडून विरोधी पावणाईदेवी परिवर्तन विकास आघाडीने सत्ता काबीज केली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील गवसे हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून येथील विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीने मोठी व्यूहरचना केली होती. उमेदवार निवडीपासून ते मतांची गोळाबेरीज करण्यासाठी नियोजन केले होते. प्रत्येक सभासदांपर्यंत निवडणुकीचा अजेंडा पोहोचवून मतांसाठी आवाहन केले जात होते. त्यामुळे इथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. विरोधी आघाडीकडून अलीसाब सय्यद, रमेश देसाई, श्रीपती गावडे, उत्तम नाईक, दिनकर नेवगे, लक्ष्मण गुरव, रसूल पिरखान यांनी नियोजन राबवले. त्याला सभासदांनी प्रतिसाद दिला. निवडून आलेले उमेदवार असे; अलीसाब सय्यद, सटुप्पा इलगे, आप्पाजी पाटील, जयसिंग माडेकर, काळू पाटील, हणमंत गुरव, रामचंद्र नांदवडेकर, अर्जुन देवळी, अलीसो फकीर, सखाराम कांबळे, मंगल नेवगे, रुक्मिणी पेडणेकर, लक्ष्मण गिरी. निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीचे उमेदवार आणि समर्थक सभासदांनी गुलाल उधळून जल्लोष केला. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील येजरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57849 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..