‘अॅग्रो प्रोड्यूसर’चे सुंडीत कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अॅग्रो प्रोड्यूसर’चे सुंडीत कार्यालय
‘अॅग्रो प्रोड्यूसर’चे सुंडीत कार्यालय

‘अॅग्रो प्रोड्यूसर’चे सुंडीत कार्यालय

sakal_logo
By

21545
सुंडी ः पांढरं सोनं अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करताना स्टार प्रो-कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई. शेजारी तुकाराम कांबळे व इतर.

‘अॅग्रो प्रोड्यूसर’चे सुंडीत कार्यालय
चंदगड, ता. १३ ः सुंडी (ता. चंदगड) येथे काजूच्या बोंडावर प्रक्रिया करणाऱ्या पांढरं सोनं अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्‍घाटन स्टार प्रो-कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते झाले. कंपनीचे अध्यक्ष ऑननरी कॅप्टन तुकाराम कांबळे अध्यक्षस्थानी होते.
कंपनीचे सचिव मनोहर कोकीतकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येथे काजू बोंडापासून ज्यूस, सरबत, जेली, चॉकलेट, फ्लेवर पावडर, सोडा असे विविध चौदा प्रकारचे पदार्थ तयार केले जाणार असल्याचे सांगितले. या कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या काजू बोंडाला चांगला दर मिळेल. दरवर्षी जाग्यावर कुजून जाणाऱ्या या फळापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होईल, असे सांगितले. कृषी विभागाचे विजय गमरे, अभिजित दावणे, सरपंच मनोहर कांबळे, डॉ. संजय पाटील, ग्रामसेविका गणाचारी, पोलिस पाटील वैजनाथ सरशेट्टी यांनी मनोगते व्यक्त केली. उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे-पवार यांच्या मार्गदर्शनाने या विभागातील काजू बोंडावर प्रक्रिया करणारा हा पहिलाच कारखाना सुरू होत असून त्याचा या विभागातील शेतकऱ्याला चांगला लाभ होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. कंपनीचे संचालक अजित कोकीतकर, विनोद मजूकर, रेणुका पाटील यांच्यासह झिमाण्णा पाटील, निंगाप्पा पाटील, तानाजी टक्केकर, माधुरी पाटील, लता कोकीतकर, धुळाप्पा सरशेट्टी उपस्थित होते. अजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उदय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57850 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top