
राजर्षी शाहू महाराज जीवन कार्य चित्ररथाचे चंदगडला स्वागत
21546
चंदगड ः छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्ररथाच्या स्वागतप्रसंगी गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदी.
राजर्षी शाहू महाराज जीवनकार्य
चित्ररथाचे चंदगडला स्वागत
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याची सचित्र माहिती देणाऱ्या चित्ररथाचे आज येथे आगमन झाले. तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, नगरपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी या रथाचे स्वागत केले.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राबवलेले विविध उपक्रम, समाजोद्धारासाठी घेतलेल्या भूमिका चित्ररुपातून अतिशय नेटकेपणाने मांडलेल्या पाहून उपस्थित भारावले. येथे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी या रथाचे स्वागत केले. चित्ररुपातून शाहू महाराजांच्या जीवनकार्याची माहिती अधिक सुस्पष्टपणे जनतेला उपलब्ध करून चांगली कामगिरी केल्याचे मत गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले. कैलास चौकात नगरपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा प्राची काणेकर, दयानंद काणेकर, नगरसेविका नेत्रदीपा कांबळे, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, नंदकुमार कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57851 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..