
आसगावकर यांची चंदगडला भेट
21547
चंदगड ः आमदार जयंत आसगावकर यांना निवेदन देताना नगरसेवक अभिजित गुरबे, निवृत्त प्राचार्य एस. व्ही. गुरबे आदी.
आसगावकर यांची चंदगडला भेट
चंदगड ः विधानपरिषदेचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आज येथे सदिच्छा भेट दिली. निवृत्त प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील शिक्षणविषयक विविध प्रश्नांवर चर्चा केली. गुरबे यांनी चंदगड तालुक्यातील शिक्षण विषयक प्रगती आणि समस्या यांचा ऊहापोह केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज असून त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. त्याला आमदार आसगावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नगरसेवक अभिजित गुरबे यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शिक्षण विकासाला निधी द्यावा, अशी मागणी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57852 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..