चोरीचा छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीचा छडा
चोरीचा छडा

चोरीचा छडा

sakal_logo
By

21640

शिये पुलावर
चोरटा जेरबंद

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : पंचगंगा नदी शिये पुलावर सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास जेरबंद केले. गणेश शामराव लांडगे (वय २०, कसबा बावडा परिसर) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ८२ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, शिये पुलावर संशयित गणेश हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन, अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार, चांदीचे पैंजण, जोडवी असा १ लाख ८२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-------------
चाकू हल्‍ल्‍यातील
संशयिताला कोठडी
कोल्हापूर ः पैसे न दिल्याच्या रागातून काल भरवस्तीत व्यावसायिकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी संशयिताला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. सुमित ऊर्फ लाल्या सूर्यकांत खोंद्रे (रा. धोत्री गल्ली) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद जखमी सागर शिंदे यांनी दिली. संशयित सुमितला न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------
तरुणास दगडाने मारहाण
कोल्हापूर ः तरुणास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. ओंकार गायकवाड व अनोळखी अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. हा प्रकार तावडे हॉटेल परिसरात काल सायंकाळी घडला. याबाबतची फिर्याद जखमी शंकर यशवंत गर्दे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57853 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top