संभाजी महाराज पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराज पूल
संभाजी महाराज पूल

संभाजी महाराज पूल

sakal_logo
By

छत्रपती संभाजी महाराज यांच्या
नावाने पुलाची स्वच्छता व्हावी’

कोल्हापूर ः लक्ष्मीपुरी परिसरातील जयंती नाल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या वाहतुकीच्या पुलाची तसेच कोनशिलेची दुरवस्था झाली आहे. त्याची देखभाल, दुरूस्ती करून नियमित स्वच्छता व्हावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, या पुलावर अवजड वाहने उभी केली जातात. त्यांच्या आडाला अस्वच्छता केली जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या पुलाची दुरवस्था अधिकाऱ्यांना दिसू नये यासारखे दुर्देव नाही. त्यामुळे या पुलाची प्रशासनाच्या पातळीवर देखभाल, दुरूस्ती करून नियमित स्वच्छता व्हावी, यासाठी प्रशासकांकडून संबंधित विभागाला आदेश द्यावेत. छत्रपतींच्या नावाने असलेल्या पुलाचे अवमूल्यन रोखावे. १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून, त्यानिमित्ताने या पुलाची स्वच्छता करावी. जिल्हाध्यक्ष संजय साडविलकर, शहर अध्यक्ष गजानन तोडकर, आनंदा कवडे, विकी भोगम, वैभव कवडे, अजित चव्हाण, बापू वडगावकर, हिंदूराव शेळके, अजित तोडकर, बबन लगारे, दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57860 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top