काजूची आवक मंदावलेलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजूची आवक मंदावलेलीच
काजूची आवक मंदावलेलीच

काजूची आवक मंदावलेलीच

sakal_logo
By

21561
आजरा : येथील बाजारपेठेत झालेली काजूची आवक. (छायाचित्र : श्रीकांत देसाई, आजरा)

काजूची आवक मंदावलेलीच
आजरा बाजारातील स्थिती; परदेशी मालाला उठाव, व्यापारी चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ : काजू बीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी यंदा बाजारात काजूची आवक मंदावलेलीच आहे. आज शुक्रवारच्या आठवडा बाजारात चार टन इतकी काजू बीची आवक झाली. गत आठवडा बाजाराइतका आजही प्रति किलो १२५ रुपये किलो इतका दर स्थिर राहिला. स्थानिक काजू बीपेक्षा काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून परदेशी काजू बीची मागणी अधिक असल्याने स्थानिक काजू बीचा उठाव होत नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत. तालुक्यात दर दिवशी तीन ते चार टन काजू परदेशी काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून खरेदी केला जात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
यंदा काजूच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. हवामान बदलाचा परिणाम या फळ पिकाला बसला आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदा काजूचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला गेला नाही. आजरा तालुक्यात ऊस पिकाच्या खालोखाल नगदी पीक म्हणून काजू बीकडे पाहिले जाते. या वर्षी हे पीक शेतकऱ्यांना हात देऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत पुरेशी काजू बीची आवक झालेली नाही. यंदा काजूचा हंगाम अंतिम टप्प्यावर आला असला तरी काजूची आवक मंदावलेलीच आहे. आजच्या बाजारात सुमारे तीस ते चाळीस व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदीसाठी काटे लावले होते. सुमारे चार टन काजू बीची आवक बाजारात झाली आहे. गत बाजाराच्या तुलनेत स्थानिक बीचा दरही १२५ इतका स्थिर राहिला. तालुक्यात परदेशी काजू बी काजू कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याने स्थानिक काजूचे मार्केट तेजीत नाही. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. स्थानिक काजूला चांगला उठाव झाला नाही, तर काजू बी खरेदी दरामध्ये वाढ होणार नाही. पुढील एक-दोन बाजारात काजू बीची बऱ्यापैकी आवक होईल, असे व्यापारी कृष्णकांत पाचवडेकर यांनी सांगितले.
---------------
कोट
स्थानिक शेतकऱ्यांकडून चांगली वाळवलेली व प्रतवारी केलेली काजू बी विक्रीसाठी बाजारात येत नाही. परदेशी काजूही प्रतवारी केलेली असते. उताऱ्याबरोबर काजू बीचा काऊंटही प्रति किलो १७० ते १८० इतका असल्यामुळे जास्त आर्थिक नुकसान होत नाही. परिणामी परदेशी काजू बी खरेदीकडे काजू कारखानदारांचा जोर आहे.
- प्रकाश कोंडुसकर- अध्यक्ष, आजरा तालुका काजू असोसिएशन, आजरा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57863 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top