पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

21644

‘संगीतोपचारा’तून उपचाराची नवी मुहूर्तमेढ

महेश काळे ः डॉ. देशिंगकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः ‘‘भारतीय संगीत समजून घेण्‍याची, त्यावर विचार झाल्यानंतर गायकांनी परिसंवाद करण्याची गरज आहे. त्यातून संगीतोपचाराच्या काही नव्या वाटा मिळू शकतील. त्याची मुहूर्तमेढ ‘संगीतोपचार’ या पुस्तकाने रोवली आहे, असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित ‘संगीतोपचार’ पुस्तकाचे प्रकाशन श्री. काळे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
श्री. काळे म्हणाले, ‘या पुस्तकाचा आवाका स्‍तिमित करणारा आहे. शास्त्रीय संगीत अगर गाणी यांचा मनावर काय परिणाम होतो, याचे एकत्रित मार्गदर्शन पुस्तकात आहे. अलीकडे संगीत मनोरंजनात्मक साधन म्हणून बघतो. संगीतात देवाची साधना, आध्यात्म, शास्त्र, आरोग्य अशा अनेक मौलिक बाबी आहेत. त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्याची जागतिक पातळीवरील गरज आहे.’’
डॉ. देशिंगकर म्हणाले, ‘संगीतोपचार प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. संगीत आनंद देते, एखादे गाणे आवडते. मात्र, ते कशामुळे आवडते, हे माहीत नसते. त्याचा शोध घेताना कोल्हापुरातील एका संगीत मैफलीत आठ रोगांवर संगीताचा उपयोग होतो. त्यापुढे जाऊन अन्य कोणत्या आजारांवर संगीताचा कसा उपयोग होऊ शकेल, हे शोधताना जवळपास ७५ रोगांवर संगीतोपचार पूरक ठरू शकतात, हे निदर्शनास आले. त्याचे अनेक पदर या पुस्तकात मांडले आहेत. सांगलीच्या नादब्रह्म संस्थेनेही काही रोगांना संगीतोपचाराचा लाभ होतो, हे दाखवले आहे. अनेक संगीतकार, गायक व संशोधक, डॉक्टरांनी दिलेली माहिती संकलित करून हे पुस्तक तयार झाले.’’
पंडित विनोद डिग्रजकर म्हणाले, ‘‘संगीत मनाला प्रसन्न करते. प्रसन्न मन बुद्धीचे बळ वाढवते, त्यामुळे संगीतोपचाराला महत्त्व आहे. त्यातून केवळ मनोकायिक व्याधीच नव्हे, तर शारीरिक व्याधीही कमी होण्यास करण्यास मदत होते.’ ॲड. प्रसन्न देशिंगकर यांनी सूत्रसंचालन केले. सीमा जोशी यांनी परिचय करून दिला. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले.
---
जोड उपचार म्हणून संगीतोपचार करा
अक्षर दालन प्रकाशन संस्थेने पुस्तक प्रकाशित केले. ६०० पानांचे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले. कोणताही आजार केवळ संगीत बरा होईल, असा दावा नाही, तर डॉक्टरांनी दिलेली औषधे, उपचार घेत राहा, पथ्य पाळा, त्याला जोड उपचार म्हणून संगीतोपचाराची मदत घ्यावी, असेही डॉ. देंशिगकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57865 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top