रुग्णालयातील फिरस्ता पुन्हा रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयातील फिरस्ता पुन्हा रस्त्यावर
रुग्णालयातील फिरस्ता पुन्हा रस्त्यावर

रुग्णालयातील फिरस्ता पुन्हा रस्त्यावर

sakal_logo
By

21565
---
रुग्णालयातील फिरस्ता पुन्हा रस्त्यावर
आयजीएम प्रशासनाला विचारला जाब ः माणूसकी फौंडेशन आक्रमक

इचलकरंजी, ता. १३ : शहरातील पोस्ट ऑफिस येथून दयनीय अवस्थेत असलेल्या फिरस्त्यास चार दिवसांपूर्वी आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी पुन्हा पोस्ट ऑफिस परिसरात तो अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने माणुसकी फौंडेशनने आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फौंडेशनचे कार्यकर्ते संतप्त झाले. संबंधित कर्मचाऱ्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अन्यथा येत्या मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा माणुसकी फौडेशनच्या वतीने देण्यात आला.
शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात अंदाजे ६५ वर्षीय पुरुष वाईट अवस्थेत असून त्यास चालता येत नाही. त्याची प्रकृतीही खालावल्याची माहिती माणुसकी फौंडेशनला मिळाली. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी फिरस्त्यास रेस्क्यू करून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्याची माहिती संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दिली.
मात्र शुक्रवारी पोस्ट ऑफिस परिसरात तो पूर्वीपेक्षाही वाईट अवस्थेत दिसून आला. चालता येत नसलेली ती व्यक्ती रुग्णालयामधून येथे कशी येऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी रुग्णालयात गेले. यावेळी रुग्णालयांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही चेक करण्यासाठी गेले असता सर्व कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले.
यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारपर्यंत संबंधित दोषी कर्मचाऱ्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. या वेळी डॉ. महेश महाडिक, रवी जावळे, इम्रान शेख, चेतन चव्हाण, रंकीत रॉय, दीपक पाटील, ओंकार सुतार, सोमनाथ बन्ने आदी उपस्थित होते.
-----------
आययजीएम रुग्णालयामध्ये कक्षसेवकांचा स्टाफ कमी आहे. उपचाराखालील रुग्ण उपचारानंतर नजर चुकवून जाऊ शकतात. तरीही संबंधित वॉर्डमधील कामावरील हजर कर्मचाऱ्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
-महेश महाडिक, वैद्यकीय अधिकारी, आयजीएम रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57868 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top