
वीज चोरी
४१ लाखांची वीज चोरी
-----
चार गुन्हे ; शिरोळ तालुक्यातील प्रकार
कोल्हापूर, ता.१३ ः शिरोळ तालुक्यातील कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून ४१ लाखांहून अधिकची वीज चोरी प्रकरणी चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. याबाबची फिर्याद महावितरणतर्फे शिवराज पाटील यांनी दिली. पोलिसांनी सांगितले, शिरोळ तालुका परिसरातील एका कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून १२ लाख १२ हजार ६८० रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी संशयित संजय कारंडे, युसूफ सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार जून २०१९ मार्च २०२२ मध्ये घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याच पद्धतीने अन्य कारखान्यातील १० लाख ६९ हजार ७१० आणि १३ लाख ७१ हजार ४४० रूपयांच्या वीज चोरी प्रकरणी संशयित वसंत कुरंदवाडे आणि महावीर कुरंदवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, एका कारखान्यात डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२२ या काळात ४ लाख ७० हजार ७३० रूपयांची वीज चोरी प्रकरणी फिर्यादीनुसार संशयित शंकर कारंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57896 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..