मुश्रीफांमुळेच पुनर्वसन दृष्टिक्षेपात, प्रमुख कार्यकर्त्यांचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफांमुळेच पुनर्वसन दृष्टिक्षेपात, प्रमुख कार्यकर्त्यांचा पलटवार
मुश्रीफांमुळेच पुनर्वसन दृष्टिक्षेपात, प्रमुख कार्यकर्त्यांचा पलटवार

मुश्रीफांमुळेच पुनर्वसन दृष्टिक्षेपात, प्रमुख कार्यकर्त्यांचा पलटवार

sakal_logo
By

मुश्रीफांमुळेच पुनर्वसन दृष्टिक्षेपात
कार्यकर्त्यांचा पलटवार; प्रकल्पाच्या पूर्णत्वातही त्यांचेच योगदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळेच आंबेओहळ प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून त्यांनीच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही दृष्टिक्षेपात आणले, असा पलटवार गडहिंग्लज व आजऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकातून केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, आजरा व गडहिंग्लजमधील शेतीला पाणी मिळूच नये, या राजकीय आकसातून काहीजण प्रकल्पाच्या पूर्णत्वाला आडकाठी आणत होते. त्यासाठी न्यायालयातही गेले. तेच लोक आता प्रकल्पग्रस्तांचा कळवळा दाखवत आहेत. अनेक अडचणींवर मात करुन मंत्री मुश्रीफ यांनी हा प्रकल्प पूर्णत्वाला नेला आहे. पाण्याने तुडुंब प्रकल्प व हिरवेगार शेतमळे बघून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. प्रकल्पाच्या पायाभरणीनंतर ९ वर्षांनी मुश्रीफ या भागाचे आमदार झाले. २०१४ मध्ये ते जलसंपदामंत्री होते. लाभक्षेत्रातील लोक जमिनी द्यायला तयार नव्हते. त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मुश्रीफ यांनी जमिनीच्या मोबदल्यात पॅकेज देण्याचा ठराव करून घेतला. काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरणात्मक निर्णयामुळे अडले आहे. त्यासाठी राज्याचे धोरण बदलावे लागेल. काहींच्या कौटुंबिक वादामुळे पुनर्वसन थांबले आहे. मुश्रीफ यांनी पक्ष बघून पुनर्वसन केलेले नाही. पत्रकावर वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, विजय वांगणेकर, बबन पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--
पुनर्वसनाचा लेखाजोखा
आंबेओहोळच्या ८४९ पैकी ३५७ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारले. ४६० मूळ पात्र प्रकल्पग्रस्त होते. संकलनानंतर त्यात ५४ ने वाढ झाली.
८८ प्रकल्पग्रस्तांना ५२.२९ हेक्टर जमीन, २८६ जणांना १५६.६० हेक्टर जमिनीसह ५७ कोटी, ४३ जणांना १९ हे. जमीन व सात कोटींचे पॅकेज वाटप झाले. आतापर्यंत एकूण ४४६ शेतकऱ्यांचे पुनर्वसन पूर्ण झाले. ६३ कोटींचे वाटप केले. अद्याप ५४ हेक्टर जमीन देय आहे. अंशत: जमीन दिलेले व मागणी केलेल्या २९ जणांना २० हेक्टर जमीन देय आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57903 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top