शासकीय योजनांचा लाभ घ्या ः आमदार प्रकाश आबिटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय योजनांचा लाभ घ्या ः आमदार प्रकाश आबिटकर
शासकीय योजनांचा लाभ घ्या ः आमदार प्रकाश आबिटकर

शासकीय योजनांचा लाभ घ्या ः आमदार प्रकाश आबिटकर

sakal_logo
By

21613
गवसे (ता. आजरा) : येथील महिला बचत गटाच्या स्टॉलला आमदार प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन माहिती घेतली.

शासकीय योजनांचा लाभ घ्या
आमदार प्रकाश आबिटकर; गवसेत महाराजस्व अभियान शिबिर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ : महाराजस्व अभियान म्हणजे शासन आपल्या दारी हीच खरी संकल्पना आहे. या अभियानाच्या माध्यामातून शासन प्रत्येकाच्या घरापर्यंत आले आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
गवसे (ता. आजरा) येथे महाराजस्व अभियान अंतर्गतशासन आपल्या दारी शिबिर उत्साहात झाले. विविध शाससकीय योजनांचा १६२३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या वेळी आमदार आबिटकर बोलत होते. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी सभापती उदयराज पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार विकास अहिर, गवसेच्या सरपंच सोनाली पाटील प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार अहिर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी महाराजस्व अभियान याबाबत माहिती दिली. आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेसाठी शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागतात. वेळ व पैसाचा अपव्यय होतो. महाराजस्व अभियानामुळे शासन जनतेच्या दारात पोहचले आहे.’’ प्रांताधिकारी बारवे म्हणाल्या, ‘‘महाराजस्व अभियान संपूर्ण तालुक्यात राबविणार असून जास्तीत-जास्त लोकांना लाभ दिला जाईल.’’ या वेळी गटविकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी, आगार प्रमुख विनय पाटील, सहायक निबंधक अशोक पाटील, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडळ अधिकारी जी. बी. पाटील, महादेव देसाई, विनायक नाईक, भारती पोवार, सुतार, तलाठी उपस्थित होते. समिर जाधव यांनी आभार मानले.
------------------
चौकट
बचत गटांचे स्टॉल आकर्षण
शासनाच्या विविध विभागचे स्टॉल शिबिरा ठिकाणी लावले होते. त्याचबरोबर बचत गटांचे खाद्यपदार्थ, उत्पादने व सेवा यांचे स्टॉल आकर्षणाचा विषय होता. आमदार आबिटकर, प्रातांधिकारी बारवे व मान्यवरांनी स्टॉलला भेटी देऊन माहिती घेतली. आरोग्य विभागातर्फे साडेसहाशे लोकांची तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडूनही जनावरांची तपासणी झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57914 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top