
पत्रकांवरील बातम्या एकत्रिपणे
शाहू कॉलेजमध्ये भित्तीपत्रक स्पर्धा
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शुक्रवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता ''डिजीटल इंडिया संधी आणि आव्हाने'' यावर वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. स्पर्धेचे ‘कॅन टेक्नॉलॉजी रिप्लेसड् टिचर?’, ‘शेअर मार्केटमधील विविध संधी व आव्हाने,’ ‘रोल ऑफ डिजिटलयाझेशन इन सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी’, ‘डिजीटल इंडियाचा– भाषा व सामाजिक शास्त्रांवर होणारा परिणाम’ असे विषय आहेत. कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाने पांढऱ्या ए फोर प्रोजेक्ट पेपरवर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत पोस्टर प्रेझेंटेशन करावयाचे आहे. माहितीसाठी डॉ. सिंधू आवळे, डॉ. बी. बी. घुरके, डॉ. एस. एस. लवेकर, डॉ. ए. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांनी पत्रकाद्वारे केले.
...
गणेश दर्शन योग रविवारी
कोल्हापूर : पुष्टपती विनायक जयंतीदिनी येणारा दशभुजा गणेश दर्शन योग हा रविवारी (ता. १५) दुपारी बारा वाजून ४६ मिनिटे ते सोमवारी सकाळी नऊ वाजून ४४ मिनिटापर्यंत आहे. नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणे यानंतर येथील शाहूपुरी कुंभार गल्लीत पंचमुखी व दशभुजा गणेश मंदिर आहे. या गणपती दर्शनाचा योग घ्या. माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन श्री पंचमुखी गणेश मंदिरातर्फे पत्रकाद्वारे केले आहे.
...
21619
कोल्हापूर : बहुजन माध्यमिक पतसंस्थेच्या कार्यक्रमात सभासदांचा सत्कार करताना आमदार जयश्री जाधव.
बहुजन माध्यमिक शिक्षक’र्फे कार्यक्रम
कोल्हापूर : जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा वार्षिक गुणगौरव, पारितोषिक वितरण, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार असे कार्यक्रम झाले. आमदार जयश्री जाधव, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. संचालक दिलीप वायदंडे यांनी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस, संजय कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस, सुजाता देसाई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस, विलास दुर्गाडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस, योगेश वराळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. संस्थाध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी स्वागत केले. आमदार जाधव यांनी महिला सभासदांना मातृ दिनाच्या तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.बाळाराम लाड, सुर्यकांत सुतार यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष विकास कांबळे यांनी आभार मानले. वैभव प्रधान यांनी सूत्रसंचालन केले. समिती सदस्य राहुल माणगांवकर, ज्येष्ठ संचालक प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे, रविंद्र मोरे, दिलीप वायदंडे, व्यवस्थापक बाबुराव साळोखे, वसुली अधिकारी समीर कळके आदी उपस्थित होते.
...
21629 उद्धव पन्हाळकर
21636 अतुल फणसाळकर
उध्दव पन्हाळकर अध्यक्षपदी
कोल्हापूर : मुक व कर्णबधिर असोसिएशन कोल्हापूर शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये मुक-कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्षपदी उध्दव पन्हाळकर, सचिवपदी अमेय गवळी यांची बिनविरोध निवडझाली. ९५ सभासद उपस्थित होते. यामधून अध्यक्ष, सचिव निवडीकरिता एकही अर्ज प्राप्त नसल्याने संघटनेची निवडणूक बिनविरोध झाली. कामगार दिनादिवशी निवड झालेल्या सभासदांचा सत्कार झाला. माजी उपसचिव संजय चव्हाण यांनी निवडणूक कामकाज पाहिले. समिती गठीत केली. अन्य कार्यकारीणी अशी : उपाध्यक्ष-अतुल फणसाळकर, उपसचिव- तेजस मुरगुडे, खजिनदार- गौरव शेलार. सदस्य असे : संतोष मिठारी, अमोल कवाळे, धीरज कांबळे, लक्ष्मण महामुनी. महिला सदस्या : जयश्री गवळी, प्रियांका महामुनी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57916 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..