पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

शिरोळला आजपासून
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

शिरोळ, ता. १३ ः येथील आझाद मंडळाच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त १४ ते १५ मेच्या दरम्यान ५० व ७० किलो वजनी गटातील निमंत्रित पुरुष गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सीताराम संकपाळ यांनी दिली. श्री. संकपाळ म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ५० किलो वजनी गटातील विजेत्या संघास रोख रक्कम १० हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास ७ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास ५ हजार रुपये व चषक दिला जाणार आहे. ७० किलो वजनी गटातील विजेत्या संघास रोख रक्कम २१ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास १० हजार रुपये व चषक दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विद्युतझोतात स्पर्धा होतील. यावेळी बी. जी. माने, श्रीकांत शिरगुप्पे, अनिलराव यादव, पंडीत काळे, अशोक पाटील, प्रकाश चुडमुंगे, दत्तात्रय काळे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57919 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top