सहकार्य करा, सेवेसाठी सदैव तत्पर ः प्रांताधिकारी वाघमोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार्य करा, सेवेसाठी सदैव तत्पर ः प्रांताधिकारी वाघमोडे
सहकार्य करा, सेवेसाठी सदैव तत्पर ः प्रांताधिकारी वाघमोडे

सहकार्य करा, सेवेसाठी सदैव तत्पर ः प्रांताधिकारी वाघमोडे

sakal_logo
By

21614
मुंगूरवाडी : शासन आपल्या दारी उपक्रमात महिलांना रेशन कार्डचे वितरण करताना बाबासाहेब वाघमोडे, दिनेश पारगे. शेजारी शरद मगर, जितेंद्र रेडेकर आदी.

सहकार्य करा, सेवेसाठी सदैव तत्पर
प्रांताधिकारी वाघमोडे : मुंगूरवाडीत शासन आपल्या दारी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
दुगूनवाडी, ता. १३ : शासन आपल्या दारी उपक्रमातून सर्व योजना जनतेच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी जनतेने सहकार्याची भूमिका घ्यावी. प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी आज दिली.
मुंगुरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील नौकूडकर हायस्कूलच्या प्रांगणात महसूल लोक जत्रा योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महागाव महसूल मंडळ विभागातील मासेवाडी, मुंगुरवाडी, दुगुनवाडी, कडाल, हिडदूगी आदी गावांचा शिबिरामध्ये समावेश होता. या वेळी, महिलांच्या लेझीम पथकांच्या सहभागाने व अधिकाऱ्यांची बैलगाडीतून मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले, ‘‘जनतेचे तालुक्यापर्यंत हेलपाटे होवू नयेत म्हणून प्रशासन आपल्या गावी येऊन शासन आपल्या दारी उपक्रमातून कामांची पूर्तता करीत आहे. जनतेने त्याचा लाभ घ्यावा. गटविकास अधिकारी शरद मगर म्हणाले, गावसभेला लोकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडणे गरजेचे आहे. प्रशासनाच्यावतीने आपल्या समस्यांचे निराकरण केले जाईल.
या लोकोपयोगी उपक्रमातून पात्र लाभार्थींना दाखले, प्रमाणपत्र, दुबार रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, बचतगट कर्ज, मंजूर विमा, शेती उपयोगी यंत्रांचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये शासनाच्या सर्व विभागांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकांनी आपापल्या विभागाच्या योजनांच्या प्रसारासाठी स्टॉल मांडले होते.
मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे यांनी स्वागत केले. तानाजी पाटील, अशोक टक्केकर यांची भाषणे झाली. निवडणूक नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, महसूल नायब तहसीलदार राजेंद्र यादव, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, तालुका आरोग्याधिकारी कोरे, तलाठी सुजाता कुडाळकर, संतोष पाटील, धनश्री पोवार, युवराज सरनोबत, साताप्पा लांडगे, स्वाती मोरे, ग्रामसेवक श्रीकांत गंबरे, मुख्याध्यापक ए. सी. देशमाने आदीसह सहभागी गावातील सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ कुपेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57924 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top