अतिक्रमण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण बैठक
अतिक्रमण बैठक

अतिक्रमण बैठक

sakal_logo
By

21642

टिपी’चे पार्किंग प्रथम करा
भाजप ताराराणी आघाडीकडून अधिकारी धारेवर

कोल्हापूर, ता. १३ ः राजारामपुरीतील महापालिकेचे विभागीय कार्यालय, नगररचना विभागाचे (टिपी) कार्यालय असलेल्या इमारतीला पार्किंग नाही. तिथे स्वतःची पार्किंगची सोय करावी व नंतर इतरांवर कारवाई करा. येथे पार्किंगची सोय होत नाही तोपर्यंत एकाही अधिकाऱ्यास कार्यालयात बसू देणार नाही, कोणी बसल्यास तोंडाला डांबर फासू, असा सज्जड दम भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी जोरदार वादावादीही झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
महापालिकेकडून राजारामपुरीत ‘सेटबॅक’मधील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. ती चुकीची तसेच राजकीय सुडबुद्धीने ठराविक व्यापाऱ्यांवर होत असल्याचे सांगत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी पोपटराव जगदाळे हॉलमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘‘राजारामपुरीतील टिपीचे कार्यालयच बेकायदेशीर आहे. ही व्यावसायिक इमारत असल्याने १०० वाहनांचे पार्किंग आवश्यक आहे. मात्र, एकाही वाहनाची पार्किंग सोय नाही. त्यामुळे दुसऱ्यांवर कारवाईचा अधिकार टिपीला नाही.’’ माजी महापौर सुनील कदम म्हणाले, ‘‘राजारामपुरी परिसराची उभारणीच नियोजन करून केली आहे. येथे वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न नाही. केवळ राजकीय आकसापोटी कारवाई सुरू आहे. जेसीबीने तयार झालेला मलबा तत्काळ उठवावा. डांबरीकरणही करावे.’’ माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी अतिक्रमण कारवाईला विरोध नाही. परंतू ,अचानक जेसीबीने कारवाई करणे योग्य नसल्याचे सांगितले. बेकायदेशीर कारवाईबाबत व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. पुढील कारवाई नागरिकांना पूर्वसूचना व कायदेशीर नोटीस बजावून आठ दिवसांची मुदत देऊनच करावी. त्यासाठी प्रथम व्यावसायिकांच्या दारात मार्किंग करावे, असेही सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी त्वरित रस्ते करून मुरूम हटवून पुढील कारवाई मार्किंग केल्यानंतरच करू असे आश्‍वासन दिले. नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, सुरेश पाटील, महादेव फुलारी, सचिन जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. भाजप-ताराराणीच्या शिष्टमंडळात मुरलीधर जाधव, रघुनाथ टिपुगडे, संग्राम निंबाळकर, रहीम सनदी, अभिजित शिंदे, योगेश मोहिते, विकी आरते, प्रितेश घोडके, प्रतीक घोडके आदी सहभागी होते.
...

21667
मनपाकडून ६ दुकानांवर कारवाई
राजारामपुरी परिसरातील रहिवाशी, वाणिज्य वापर इमारतीमधील सेटबॅकमधील बंदिस्त पार्किंग, अनाधिकृत बांधकामावर महापालिका करत असलेल्या कारवाईनंतर शुक्रवारी राजारामपुरी परिसरातील ६६ दुकानधारकांनी स्वत:हून पार्किंगला अडथळा होणारे उंचवटे, कट्टे, पत्र्याचे शेड, छपऱ्या काढून घेतल्या. ६ दुकानदारांवर इमारतीमधील पार्किंग बंदिस्त केल्याने व काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकामे केली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नगररचना, विभागीय कार्यालय क्रमांक ३ व ४, अतिक्रमण, परवाना व इस्टेट विभागामार्फत संयुक्त कारवाई केली. तसेच दुकानदारांना मार्किंग करून देण्यास सुरूवात केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57932 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top