
प्रतिबिंब गंगावेश चौक रस्ते दुरुस्ती सुरु
21647
गंगावेस चौक, रस्त्यांची दुरुस्ती सुरू
कोल्हापूर, ता. १३ : शहरातील प्रमुख चौक असलेल्या गंगावेस येथील रस्त्यांची दुरुस्ती अनेक वर्षांनी सुरू झाली आहे. शहरातील अत्यंत गजबजलेला चौक, अशी गंगावेसची ओळख आहे. मात्र, या चौकातील प्रवास अत्यंत खडतर व जीवघेणा बनला होता. शिवाजी पूल मार्गे वडणगे, पन्हाळा व पुढे बांबवडे, मलकापूरकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. तसेच गगनबावडा, करवीरमधील लोकांना शहरात येण्यासाठी याच चौकातून यावे लागते. मात्र, संपूर्ण चौकाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना गल्लीबोळातून प्रवास करावा लागत होता. या सर्वांची दखल, नागरिकांच्या तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर या चौकातील रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चौकात गर्दी असते. दूधकट्टा, बाजार, मंदिर, केएमटी बस थांबा असल्याने दिवसभरात हजारोंच्या संख्येने लोकांचा वावर चौकात असतो. गर्दी असल्याने विविध व्यवसायही येथे उभारले आहेत. मात्र, या चौकातील रस्ता खूप खराब झाला होता. यातच नाले व केबल खोदाईमुळे चौकाची दुरवस्था झाली होती. या चौकात छोटे-मोठे अपघातही होत होते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता. महापालिकेने चौकातील रस्ते दुरुस्तीला सुरुवात केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57976 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..