
मागास आयोगाचा कार्यक्रम जाहीर
मागास प्रवर्गास आरक्षणासाठी
मत मांडण्याची २१ ला संधी
कोल्हापूर : मागास प्रवर्गास आरक्षणासाठी गठीत केलेल्या समर्पित आयोगाचा शनिवारी (ता. २१) रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा दरम्यान भेटीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या वेळी मते मांडावीत आणि निवेदन द्यावीत. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे) येथे आपल्या नावाची नोंदणी, भेटीच्या तारखेपूर्वी करावी, असे आयोगातर्फे कळविले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57980 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..