
टुडे ४
21625
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन देताना उपस्थित मान्यवर.
विद्यापीठात पाली भाषेचे केंद्र
सुरू करण्यासाठी निवेदन
कोल्हापूर, ता. १३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात पाली भाषेचे केंद्र सुरू करावे, अशा आशयाचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. पाली भाषेत संशोधन करुन डॉक्टरेट पदवी संपादन केलेले भदंत डॉ. यशकाश्यपायन महाथेरो यांच्या उपस्थितीत हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, पाली भाषेतील शिकवणूक मानवी जीवनात माणुसकी प्राप्तीचा मार्ग असून, तो माणुसकीचा मूलमंत्र असल्याचे डॉ. यशकाश्यपायन यांनी डॉ. शिर्के यांना सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकालात भगवान बुद्धांचा समतेचा विचार कृतीत आणल्याचे तसेच राजर्षींनी, डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर समतेसाठी कार्य केल्याचे सांगितले. कोल्हापूर, कराडच्या परिसरात अनेक ठिकाणी बुद्ध गुंफा आहेत. मसाई पठार, आगाशीव बुद्ध लेणी, चचेगावातील स्तूप आदीशी राजर्षी आणि डॉ. आंबेडकरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेबांचे कोल्हापूरला सातत्याने येणे-जाणे होते. त्यामुळे माणगावला १९२० मध्ये डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत परिषद झाली.
पाली भाषेचे केंद्र सुरू केल्यास बुद्धकालीन सामाजिक, शैक्षणिक बाबींचा उलगडा होण्यास मदत होईल. कोल्हापूर बुद्धीस्ट सर्किट होण्यास मदत होईल. जेणेकरुन भविष्यात कोल्हापूर आणि आसपासचा परिसर पर्यटन स्थळ निर्माण होईल. विविध ठिकाणांहून पर्यटक येतील. अनेकांना उद्योग-व्यवसायही मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. अॅड. शिवाजीराव घाटगे, चंद्रकांत सूर्यवंशी, भगवान बुचडे, सर्जेराव वडणगेकर, दीपक भोसले उपस्थित होते.
...
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57985 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..