प्रवेशाचे आवाहन सैनिक,शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेशाचे आवाहन सैनिक,शाळा
प्रवेशाचे आवाहन सैनिक,शाळा

प्रवेशाचे आवाहन सैनिक,शाळा

sakal_logo
By

सैनिक वसतिगृहात प्रवेश सुरू
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिक मुला/मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ सवलतीच्या दरात प्रवेश देणे सुरू झाले आहे. सेवारत, माजी सैनिक, विधवा यांच्या ११ वी व त्या पुढील वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुला/मुलींना गुणवत्तेच्या आधारावर सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज घ्यावेत. भरलेले अर्ज त्यासोबत जोडावयाच्या सर्व कागदपत्रासह ३१ मे पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात (कोल्हापूर) येथे जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे, तसेच अधीक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
-
शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा मसुदमाले (ता. पन्हाळा) यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन प्रवेश देणे सुरू आहे. इयत्ता ६ वी ते १० वी करीता एस. सी., एस. टी., व्ही. जे. एन. टी., एस. बी. सी. या प्रवर्गातील मोफत प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी केले आहे.
-
सुनील पाटील यांना धनादेश सुपूर्द
कोल्हापूर : खेबवड्याचे सेवारत सैनिक सुभेदार सुनील नामदेव पाटील यांनी २०१६ रोजी जम्मू-कश्मिर सीमेवर कुपवाडा (चौकीबाल) या ठिकाणी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल २०१७ रोजी रक्षा मंत्रालयामार्फत ‘सेना मेडल’ हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शासनाकडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत ५ लाख ५० हजारांचा धनादेश सुपूर्द केला. सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार, उत्तम वेताळ, प्रसाद राणे, शौर्यपदकधारक सेवारत सैनिक सुभेदार पाटील, त्यांच्या पत्नी, मुलगी व मुलगा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57992 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top