रमेश कदम अँकँडमी अंतीम फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमेश कदम अँकँडमी अंतीम फेरीत
रमेश कदम अँकँडमी अंतीम फेरीत

रमेश कदम अँकँडमी अंतीम फेरीत

sakal_logo
By

रमेश कदम ॲकॅडमी अंतिम फेरीत
यतीराज पाटोळेचे ९, आदित्य पिसाळचे ८ बळी 

कोल्हापूर, ता.१३: कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व स्व. सौ. मालती शामराव पाटील ट्रस्ट पुरस्कृत १९ वर्षाखालील कै. सौ. मालती पाटील क्रिकेट स्पर्धेतील आजचा उपांत्य सामना (दोन दिवसीय) रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध पॅकर्स क्रिकेट क्लबमध्ये झाला. रमेश कदमने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पॅकर्सने पहिल्या डावात २७.१ षटकांत सर्व बाद १०० धावा केल्या. यामध्ये महादेव पोवारने २८, राघव पाटीलने २७ धावा केल्या. रमेश कदमकडून पहिल्या डावात यतीराज पाटोळे ४, करण वाघमोडे २, आदित्य जाधव, रोहीत बिराजदार व देवरणवीर थोरात यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. रमेश कदमने पहिल्या डावात २६ षटकांत सर्व बाद ११२ धावा केल्या. यामध्ये यतीराज पाटोळेने ४१, करण वाघमोडेने २७, आदित्य जाधव १३ धावा केल्या. पॅकर्सकडून पहिल्या डावात आदित्य पिसाळ ५, रोहीत भिसेने ४ व कार्तीक पाटीलने १ बळी घेतला. रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीने पहिल्या डावात १२ धावांची आघाडी घेतली. पॅकर्सने दुसऱ्या डावात ३९.३ षटकांत सर्वबाद १८८ धावा केल्या. यामध्ये कार्तीक पाटील ५४, आदित्य पिसाळ ४२, जुनेद मलबारी १४ धावा केल्या. रमेश कदमकडून दुसऱ्या डावात यतीराज पाटोळे ५, देवरणवीर थोरात २ व आर्यन वर्माने १ बळी घेतला. रमेश कदमने दुसऱ्या डावात दिवसअखेर ३४ षटकांत ५ बाद १०४ धावा केल्या. यामध्ये आदित्य जाधव नाबाद ४५, करण वाघमोडे २३ व देवरणवीर थोरात २१ धावा केल्या. पॅकर्सकडून दुसऱ्या डावात आदित्य पिसाळ ३, रोहीत भिसे व शुभम कुरणे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशा प्रकारे सामना अनिर्णीत राहिला. रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीने पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57993 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top