गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान
गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान

गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान

sakal_logo
By

इचलकरंजीच्या तिघांना
समुद्रात बुडताना वाचविले
गणपतीपुळेत स्पीड बोट चालकांचे प्रसंगावधान

रत्नागिरी, ता. १३ ः गणपतीपुळे येथे आज समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना मोरया स्पोर्टस्‌ स्पीड बोट चालकांनी वाचवले. तिन्ही पर्यटक इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील आहेत. ही घटना सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. जीवरक्षकाअभावी येथील किनाऱ्यावर येणारे पर्यटक असुरक्षित मानले जात आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील वातावरण बदलले असून समुद्र खवळलेला आहे. इचलकरंजीतील विकास जाधव (वय ४६), संजना जाधव (४०), अंचल करंजे (२१) देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लाटेसोबत तिघेही खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोल पाण्यात जाऊ लागले. पाण्याला असलेला वेग आणि लाटांमुळे त्यांना माघारी किनाऱ्यावरही येता येत नव्हते. ते बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर किनाऱ्यावर गोंधळ सुरू झाला. पाण्यात बुडत असताना किनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टस्‌चे सदस्यांनी स्पीड बोटीच्या मदतीने त्वरित बुडणाऱ्या व्यक्तींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. लाटांमुळे स्पीडबोट चालकांनाही बुडणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळा येत होता. हा प्रकार समजल्यानंतर गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार मधुकर सलगर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
कोट
समुद्र खवळलेला असून लाटांचा वेग वाढल्याने त्यात पोहणे जिकिरीचे आहे. किनारी भागात खड्डे पडले असून वाळू वेगाने सरकत आहे.
- किसन जाधव, स्थानिक व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57994 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top