
मनपा आरोग्य विभाग
21664
महापालिकेचा आरोग्य विभाग प्रथम
कोल्हापूर, ता. १३ : विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रम २०२१-२२ या वर्षात राबविल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे येथील यशदामध्ये झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण तथा आढावा बैठकीत महापालिकेला प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविणले. शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक यांनी गौरव स्वीकारला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील सावित्रीबाई फुले रूग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल व ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र यांच्या मार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने गरोदर माता नोंदणी व तपासणी, ० ते १६ वयोगटातील मुलांचे नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना इत्यादी कार्यक्रम राबविले जातात. हे कार्यक्रम महापालिकेच्या वैद्यकीय टिमने प्रभावीपणे राबवून बक्षीस मिळविले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. उद्दिष्ट पूर्तीकरिता सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, लॅब टेक्निशीयन, फार्मासिस्ट व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57997 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..