'' छत्रपती संभाजी महाराज​''​ जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'' छत्रपती संभाजी महाराज​''​ जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रम
'' छत्रपती संभाजी महाराज​''​ जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रम

'' छत्रपती संभाजी महाराज​''​ जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

21677

छत्रपती संभाजी महाराज की जय!
जयंतीनिमीत्त आज व्याख्यान, पुस्तक वितरणांसह दीपोत्सव होणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा शनिवारी (ता.१४) उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध संस्था-संघटनांच्या वतीने लोकोपयोगी​ व पारंपरिक समारंभांचे आयोजन केले आहे.​ शहरातील मध्यवर्ती बिंदू चौक येथे दिवसभर स्वछता मोहीम राबवण्यात आली. येथे छत्रपती संभाजी महाराजांचा २१ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी जयंती उत्सव साजरा होणार असून, भगव्या पताकांनी शहर शंभूमय झाले आहे. ​
​रुईकर कॉलनी येथील शंभूराजेंच्या पूर्णाकृती स्मारकास विविध संस्था-संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडतर्फे सकाळी ९ वाजता, जन्मोत्सवाचे आयोजन केले असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी अंतर्गत कृतज्ञता पर्वानिमीत्त ''छत्रपती शाहूंच्या आठवणी'' या पुस्तकाच्या १ हजार प्रतींचे वाटप​ करण्यात येणार आहे. ​ शिवशक्ती प्रतिष्ठान, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या​ ​वतीने स्मारक परिसराची स्वच्छता, सुशोभिकरण व दिपोत्सव अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे.
पापाची तिकटी येथील शंभूराजे स्मारक, बिंदू चौक, मिरजकर​ ​तिकटी, छत्रपती संभाजीनगर परिसर​ येथे तसेच रामानंदनगर, जरगनगर, रायगड कॉलनी ​येथील मंडळांनी एकत्रित येऊन संयुक्त छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन ​केले आहे. येथे विविध स्पर्धांसह व्याख्यान, शाहिरी पोवाडे, मिरवणूक, अभिवादन ​असे कार्यक्रम होणार आहे​त​.
..
डॉ. श्रीमंत कोकाटे
यांचे आज व्याख्यान
ःस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी (ता.१४) सायंकाळी चार वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज'' या विषयावर ते संवाद साधतील. छत्रपती शाहू महाराजांचा विचार कृतिशीलपणे जपलेल्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव होणार आहे.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. डॉ. कपील राजहंस, शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, डॉ. जे. के. पवार यांचा यावेळी गौरव होईल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी केले.
..
संभाजी महाराजांचा इतिहास
नव्या पिढीसमोर यावा
छत्रपती संभाजी महाराज यांचा खराखुरा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे, असे मत शिवचरित्र अभ्यासक, वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले. संयुक्त छत्रपती संभाजीनगर (उपनगर) उत्सव समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात संभाजी महाराज सर्व गोष्टीत तरबेज झाले. अध्यात्म, राजकारणासह विविध विषयांवरील ग्रंथ त्यांनी लिहिले. कमी वयात युद्ध मोहिमांचे नेतृत्व करत शौर्याने त्यांनी स्वराज्याच्या सीमा वाढवत नेल्या. प्रतिकुल परिस्थिती अनुकुल करून योजना आखणे, त्याचे नियोजन करणे व अभ्यास करून त्याच्यावर विजय मिळवणे, हे संभाजी महाराजांच्या यशाचे सूत्र होते. हा सारा इतिहास नव्या पध्दतीने मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58007 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top