शाहू कृतज्ञता- प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू कृतज्ञता- प्रदर्शन
शाहू कृतज्ञता- प्रदर्शन

शाहू कृतज्ञता- प्रदर्शन

sakal_logo
By

21676

कोकणातील चित्रकारांचा
कलानगरीत कलाविष्कार
कोल्हापूर, ता. १३ ः लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षा निमित्त कोकणातील सहा कलाकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सराय आर्ट गॅलरी येथे झाले. प्राचार्य अजय दळवी,चित्रकार विजय टिपुगडे,प्राचार्य प्रकाश राजेशिर्के, अस्लम मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी कलाकार कलाकार विष्णू परीट, प्रकाश महिंदकर, संकेत कदम, दिगंबर मांडवकर, प्रणव फराकटे व बालकलाकार रेहा राजेशिर्के , डॉ जहिदा मुल्ला, राजेशिर्के, रिषिका राजेशिर्के आदी उपस्थित होते प्राचार्य अजय दळवी म्हणाले, ‘‘कोकणाचा समृद्ध निसर्ग कलाकारांना नेहमीच प्रेरणा देतो त्यामुळे अनेक कलाकार या मातीत घडले आहेत. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टने शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त हे प्रदर्शन भरले आहे यातच कलाकारांची शाहू राजांच्या विषय असणारी आपुलकी दिसून येते.‘‘
नऊ वर्षीय बालकलाकार रेहा राजेशिर्के हिच्या कलाकृतींचाही प्रदर्शनात समावेश आहे. सराय आर्ट गॅलरी (शिवशिल्प कॉलनी , विद्यापीठ मार्ग सम्राटनगर) येथे अठरा मेपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी आठ यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58017 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top